शहरं
Join us  
Trending Stories
1
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
2
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
4
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
5
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
6
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
7
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
8
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
9
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
10
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
11
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
12
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
13
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
14
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
15
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
16
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
17
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
18
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
19
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
20
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP Election 2026: प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माघार, पाठिंब्याचा खेळ; स्वीकृतचे आमिष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 19:15 IST

मतदान फुटू नये यासाठी खेळी, गठ्ठा मतांवर उमेदवारांचे लक्ष

सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माघार आणि पाठिंब्याचा खेळ सुरू झाला आहे. काटाजोड लढती असणाऱ्या मतदारसंघांत एकेक मतासाठी रस्सीखेच सुरू असून, उमेदवारांनी गठ्ठा मतदानावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.

निवडणुकीच्या जाहीर प्रचारासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. या स्थितीत मतदानाची गोळाबेरीज करण्याचे काम उमेदवारांकडून सुरू आहे. कोणत्या भागातून गठ्ठा मतदान मिळेल आणि कोणत्या भागातून मतदान फुटण्याची शक्यता आहे, याचा अभ्यास सुरू आहे. जिल्हाभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात अपक्षांची संख्याही मोठी आहे. या अपक्षांनी मते खाल्ल्यास आपल्याला पराभवाचा दणका बसू शकतो, अशी भीती उमेदवारांना आहे.

अशा अपक्षांना ऐनवेळी आपल्याकडे वळवून घेण्याचा खटाटोप सुरू आहे. त्यातूनच जिल्हाभरात माघार आणि पाठिंब्याचा खेळ रंगू लागला आहे. अनेक मतदारसंघांत अपक्षांनी माघार घेऊन अधिकृत उमेदवाराला पाठिंबा दिल्याची पत्रके निघू लागली आहेत. अर्थात, अपक्षांच्या माघारीसाठी काय सेटलमेंट झाली, हे मतदार चांगलेच जाणून आहेत.

मिरज पूर्व भागातील दिग्गज नेत्याने गेल्या सहा महिन्यांपासून एका प्रस्थापित पक्षासाठी गावात प्रचार केला. पक्षनेत्याच्या जाहीर सभादेखील घेतल्या. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पक्षाचे पॅनल उभे केले. पण, प्रत्यक्ष निवडणुकीत पक्षाकडून किंवा पक्षनेत्याकडून रसद मिळेना झाल्यावर रिंगणातून माघार घेतली. तीनही उमेदवारांसह दुसऱ्या पक्षाला पाठिंबा दिल्याची घोषणा केली. इतकेच नव्हे, तर सध्या तो विरोधी पक्षाच्या जाहीर सभांमध्ये व्यासपीठावर दिसत आहे.

जतमध्ये निवडणुकीत अर्ज भरुन माघारीसाठी भरभक्कम घबाड मिळविण्याच्या नियोजनात असलेल्या एका उमेदवाराला नाईलाजाने माघार घ्यावी लागली. अधिकृत उमेदवाराकडून माघारीसाठी कोणतीही विनंती न आल्याने स्वत:हून त्याने माघार घेत एका पक्षाच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा दिला. आपल्या समर्थक मतदारांनी त्याला भरभरून मते द्यावीत, असे आवाहन तो करू लागला आहे.

बंडखोरांना स्वीकृतचे आमिष

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांत स्वीकृत सदस्य घेण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. त्याचा दाखला देत बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांना माघारीच्या रिंगणात ओढण्याचे पक्षनेत्यांकडून सुरू झाले आहेत. शेवटच्या दोन-तीन दिवसात अपक्षाला माघार घ्यायला लावून प्रचारात सोबत फिरविण्याचे नियोजन आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli ZP Election: Withdrawals, Support Games, and Allurements in Final Phase

Web Summary : Sangli ZP election sees strategic withdrawals and support shifts. Candidates focus on securing bloc votes, attempting to sway independents with promises amid close contests. Rebel candidates are being enticed with nominated positions.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६SangliसांगलीPoliticsराजकारण