शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

जत बसस्थानकात सुविधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:33 IST

फोटो ओळ : जत बसस्थानकाची विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जागेवर दक्षिण व उत्तर बाजूने अतिक्रमण झाले आहे. लोकमत ...

फोटो ओळ : जत बसस्थानकाची विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जागेवर दक्षिण व उत्तर बाजूने अतिक्रमण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

संख : विजापूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर मोक्याच्या ठिकाणी जत एस. टी. आगाराची जागा आहे. येथे ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ उपक्रमातून (बी.ओ.टी.) अद्ययावत असे शाॅपिंग माॅलसह सर्व सोयींयुक्त बसस्थानक उभारावे. यासाठी आ. विक्रम सावंत यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा तालुकावासीयांतून व्यक्त होत आहे.

जत एस. टी. आगाराची विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर तसेच जत-शेगाव मार्गावर साडेचार एकर इतकी जागा आहे. या जागेवर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. यामुळे एस.टी. आगाराच्या बांधकामला अडचण निर्माण झाली आहे.

तालुक्यातील एकूण गावाचा विचार करत येथे सर्व सोयींयुक्त असे अद्ययावत बसस्थानक यापूर्वीच होणे अपेक्षित होते; पण याकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष दिले नाही.

आ. विक्रम सावंत यांनी विशेष प्रयत्न करून जत येथील एस .टी. आगाराचे विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्ग व मंगळवेढा व ऐगळी या राज्यमार्गावरील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागेवर बीओटी तत्त्वावर अद्ययावत बसस्थानक उभे करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच सध्या ज्या ठिकाणी जत आगाराचे एस. टी. बसस्थानक व वर्कशॉप आहे. त्या ठिकाणी फक्त एस.टी.चे वर्कशॉप ठेवून एस.टी. बसस्थानकाच्या जागेवर बीओटीतून शाॅपिंग माॅलसह दुकान गाळेही बांधता येतील. यामुळे एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

चाैकट

कर्नाटकातील सुविधा पाहा

कर्नाटक राज्यातील इंडी, अथणी, जमखंडी ही सीमेलगतच्या तालुक्यातील सर्वच परिवहन विभागांतर्गत असलेली बसस्थानके अद्ययावत आहेत. कर्नाटकमधील या विकासकामांची दखल घेऊन आपण आपल्या बसस्थनकांचा विकास करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.