शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

‘कृष्णा’च्या सत्तेसाठी कुरघोड्यांचा बाजार

By admin | Updated: January 30, 2015 23:17 IST

साखरसम्राटांसह मातब्बरांचे लक्ष : एकमेकांचे विरोधक मनोमीलनाच्या तयारीत; आतापासूनच चुरस

अशोक पाटील - इस्लामपूर -- दक्षिण महाराष्ट्रात सहकारी कारखानदारीत अग्रेसर असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लवकरच लागणार आहे. या निवडणुकीकडे याच परिसरातील साखरसम्राटांसह मातब्बरांचे लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते, माजी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, डॉ. इंद्रजित मोहिते आणि मदन मोहिते हे सत्तेसाठी एकमेकांवर कुरघोड्या करत असल्याची चर्चा असून, त्याला आमदार जयंत पाटील, माजी आमदार विलासराव उंडाळकर, डॉ. पतंगराव कदम हे नेते खत-पाणी घालत आहेत. त्यामुळे यावेळची कारखान्याची निवडणूक अत्यंत चुरशीने होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.विधानसभा निवडणुकीत विलासराव पाटील—उंडाळकर आणि डॉ. अतुल भोसले एकमेकांच्या विरोधात लढले. परंतु सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कृष्णा’च्या निवडणुकीत हे दोघे एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अविनाश मोहितेही डॉ. सुरेश भोसले यांच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा आहे. ते आता डॉ. इंद्रजित मोहिते यांना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत, तर गत निवडणुकीत मदन मोहिते आणि इंद्रजित मोहिते एकत्रित असताना, यावेळी मात्र हे दोघेही स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत असल्याचे कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे. डॉ. सुरेश भोसले यांनी सध्या तरी या निवडणुकीविषयी मौन पाळले आहे. विधानसभा निवडणुकीत डॉ. इंद्रजित मोहिते आणि मदन मोहिते यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रचार केल्याने, अंतिम टप्प्यात डॉ. भोसले निवडणुकीत पॅनेल उतरवून विधानसभेचे उट्टे काढतील. त्यासाठी अविनाश मोहिते यांचीही साथ घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न राहतील.डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या पाठीशी माजी मंत्री पतंगराव कदम यांची मोठी यंत्रणा आहे, तर कृष्णाकाठचे बहुतांशी सभासद मदन मोहिते यांचे नेतृत्व मानून सवतासुभा मांडण्याच्या तयारीत आहेत. अविनाश मोहिते हे जयंत पाटील यांचे नेतृत्व मानत असल्याची चर्चा आहे. परंतु जयंत पाटील यांना या निवडणुकीत कितपत रस आहे, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. तरीसुध्दा ‘कृष्णा’वर वरचष्मा असावा म्हणून जयंत पाटील यांचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी विलासराव उंडाळकर यांचीही मदत घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कृष्णा कारखान्याची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. तरीसुध्दा सत्तेसाठी नेतेमंडळी आतापासूनच कामाला लागली आहेत. अविनाश मोहिते, डॉ. सुरेश भोसले, डॉ. इंद्रजित मोहिते, मदन मोहिते हे एकमेकांच्या कुबड्या घेऊन निवडणूक लढविणार, की स्वताकदीवर वेगवेगळी पॅनेल टाकून निवडणूक लढणार, हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल.राजकीय समीकरणे बदलणार... विधानसभा निवडणुकीत विलासराव पाटील—उंडाळकर आणि डॉ. अतुल भोसले एकमेकांच्या विरोधात लढले. परंतु सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कृष्णा’च्या निवडणुकीत हे दोघे एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अविनाश मोहितेही डॉ. सुरेश भोसले यांच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा आहे. ते आता डॉ. इंद्रजित मोहिते यांना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत, तर गत निवडणुकीत मदन मोहिते आणि इंद्रजित मोहिते एकत्रित असताना, यावेळी मात्र हे दोघेही स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत आहेत. या कुरघोड्यांना आमदार जयंत पाटील, माजी आमदार विलासराव उंडाळकर, डॉ. पतंगराव कदम हे नेते खत-पाणी घालत असल्याची चर्चा आहे.