शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

एक कोटीची लाच मागणारा बडतर्फ पोलीस नाईक अखेर अटकेत, 'या' प्रकरणी पोलिसांनी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 1:39 PM

तिवडे याने एक कोटी रुपये लाचेची मागणी केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती

कुपवाड (सांगली) : शेतजमिनीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी निलंबित पोलीस नाईक जॉन विलास तिवडे याने एक कोटी रुपये लाचेची मागणी केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. या निलंबित पोलीस नाईक जॉन तिवडेला कुपवाड पोलिसांनी आज, बुधवारी मिरज येथे अटक केली आहे. तिवडे याच्याविरोधात सप्टेंबर २०२० मध्ये नात्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचार केल्याप्रकरणी  गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तो दोन वर्षापासून फरार होता. अखेर कुपवाड पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.तिवडेने कर्नाटक येथून कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. कुपवाड पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे त्याचा बेळगाव हुबळी परिसरात शोध घेतला होता मात्र तो हाताला लागला नव्हता. आज सकाळी संशयित तिवडे मिरजेत आल्याची बातमी समजतात पोलिसांनी सापळा रचून त्यास अटक केली. मुलीचे अपहरण व अत्याचार प्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.कोल्हापुरात लाचेच्या मागणी प्रकरणी गुन्हा दाखलशेत जमिनीच्या दाव्याचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी तक्रारदाराकडे १ कोटी लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा निलंबित अंगरक्षक पोलीस नाईक जॉन वसंत तिवडे, (रा. कोरोची ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याच्याविरोधात (दि.६ ऑगस्ट) रोजी शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, तक्रारदाराचे शेत जमिनीबाबत महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण पुणे, खंडपीठ पुणे येथे दावा सुरु आहे. दाव्याचा निकाल प्रशासकीय सदस्य माजी जिल्हाधिकारी माने यांना सांगून तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्याचे सांगितले. त्यासाठी तुमच्या विरुध्द पार्टींने एक कोटी देण्याची तयारी दाखवली आहे त्याप्रमाणे तुम्ही देखील तयारी करा असे म्हणून लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. यानंतर पथकाने लाचेच्या मागणीबाबत दि.२२ मार्च २०२२ रोजी पडताळणी केली. या पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलीस नाईक जॉन तिवडे याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी