शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 7:40 AM

Who is Nidhi and Aditi Akhilesh Yadav : निधी मैनपुरीसह सपाच्या इतरही उमदेवारांसाठी रोड-शो, गृहभेटी व चौकसभा घेत पक्षाचा प्रचार करीत आहेत. त्यांच्या या दौऱ्यामध्ये अजून एक तरुण चेहरा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

लखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची मुलगी आदिती यादवच्या निमित्ताने मुलायमसिंह यादव यांची तिसरी पिढी उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रिय झाली आहे. असे म्हणतात उत्तर प्रदेशमध्ये जन्मजात राजकारणाचं बाळकडू मिळत असते, परंतु एका प्रमुख राजकीय घराण्यातच अदिती यांचा जन्म झाल्याने त्यांचे राजकारणातलं हे पाऊल उत्तर प्रदेशच्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचे मानले जात आहे. 

निधी मैनपुरीसह सपाच्या इतरही उमदेवारांसाठी रोड-शो, गृहभेटी व चौकसभा घेत पक्षाचा प्रचार करीत आहेत. त्यांच्या या दौऱ्यामध्ये अजून एक तरुण चेहरा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. निधी यादव असे या तरुणीचे नाव आहे. दाेघीही समाजवादी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत.अदिती यादव यांना प्रत्येक पायरीवर निधी यादव यांची सोबत मिळत आहे.  प्रत्येक सभेला हजेरी लावणं असो की, प्रचाराची रणनीती ठरवणे असो, अदिती व निधी या दोहोंनी प्रचाराचा बराचसा भार आपल्या खांद्यावर घेतलेला दिसतोय. अदिती यांच्यासोबत सावलीसारख्या असलेल्या निधी यादेखील चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. अदिती यांनी प्रचार दौऱ्यात कोणत्या मतदारांशी संवाद साधावा, कोणाच्या घरी चहापान घ्यावा, प्रचारात कोणते स्थानिक मुद्दे मांडावे या सर्वांचं मायक्रो प्लॅनिंग निधी यांच्याकडून केले जातेय.

कोण आहेत निधी यादव?सपाचे माजी आमदार वासुदेव यादव यांची निधी यादव ही मुलगी आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत निधीला सपाने हडिया विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले होते. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी निधी यांना निवडणुकीचे बारकावे शिकण्यासाठी तीन महिने अमेरिकेतदेखील पाठवले होते. यावरून त्या यादव परिवाराच्या किती जवळ आहेत, याचा अंदाज येऊ शकतो.

महिला आघाडीची जबाबदारीनिधी यादव यांना अखिलेश यादव यांनी सपाच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. तरुण व आक्रमक चेहरा असलेल्या निधी यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये सपाच्या महिला आघाडीची चांगली फळी बांधली आहे. निधी यांनी ग्रामीण महिलांशी संपर्क वाढवत त्यांना पक्षाशी जोडण्याचे काम केले आहे. 

निधी या प्रयागराजमध्ये स्वत: पदवी महाविद्यालय चालवत असून, या व्यतिरिक्त त्यांनी या परिसरात गोशाळांचीही जबाबदारी घेतली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्या अदिती यांना राजकारणाचे बारकावे समजून सांगताना दिसत आहेत.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४