Join us  

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 9:48 AM

Stock Market Open: चालू आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 71 अंकांच्या मजबुतीसह 73967 अंकांवर उघडला.

Stock Market Open: चालू आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 71 अंकांच्या मजबुतीसह 73967 अंकांवर तर निफ्टी 31 अंकांच्या मजबुतीसह 22473 अंकांवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात मंगळवारी बीपीसीएल, टायटन, एचयूएल, नेस्ले इंडिया, ओएनजीसी, आयटीसी आणि टेक महिंद्रा या कंपन्यांचे शेअर्स वधारले, तर एचसीएल टेक, बजाज ऑटो, डिव्हिस लॅब, लार्सन अँड टुब्रो, जेएसडब्ल्यू स्टील, सिप्ला आणि पॉवर ग्रिड या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा निर्देशांकात घसरण नोंदविण्यात आली, तर निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस निर्देशांकात वाढ झाली. रिझर्व्ह बँकेने पायाभूत सुविधांच्या वित्तपुरवठ्याशी संबंधित नवीन नियमांमुळे सोमवारी शेअर बाजारात मोठी चिंता दिसून आली होती. 

प्री ओपन मार्केटमध्ये स्थिती 

प्री ओपन मार्केटमध्ये बीएसई सेन्सेक्स 62 अंकांच्या वाढीसह 73958 अंकांवर व्यवहार करत होता, तर निफ्टी 22503 अंकांवर व्यवहार करत होता. शेअर बाजाराचे कामकाज सामान्य नोटवर सुरू होऊ शकते, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळत होते.  

या शेअर्समध्ये तेजी / घसरण 

मंगळवारी विप्रो लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स, ओएनजीसी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, कोटक महिंद्रा बँक आणि भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर एचडीएफसी बँक, इन्फोसिस, बीएसई लिमिटेड आणि एचसीएल टेकच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.  

गौतम अदानी समूहाच्या 10 पैकी 9 लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात घसरणीसह ट्रेड करत होते. तर एनडीटीव्हीच्या शेअरमध्ये किरकोळ वाढ दिसून आली. 

टॅग्स :शेअर बाजार