शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 9:31 AM

Maharashtra Lok sabha Election Third Phase Voting: ११ मतदारसंघांत ११४ मतदान केंद्रे संवेदनशील असून यापैकी सातारा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ४० मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही.  

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची वैयक्तिक प्रतिष्ठा पणाला लागल्याने सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या अनुक्रमे बारामती, सोलापूरसह राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघांत मंगळवारी मतदान होत आहे. २ कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून केंद्रीय मंत्री नारायण राणे, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भाजपचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले, शाहू महाराज छत्रपती यांच्यासह एकूण २५८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.  

११४ मतदान केंद्रे संवेदनशील११ मतदारसंघांत ११४ मतदान केंद्रे संवेदनशील असून यापैकी सातारा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ४० मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही.  

या लढतींकडेही असेल लक्ष रायगड : अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उद्धवसेनेचे अनंत गीते हे तिसऱ्यांदा आमने-सामने.  लातूर : काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे आणि भाजपचे सुधाकर शृंगारे यांच्यात सामना. इथे काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला. उस्मानाबाद : उद्धवसेनेचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवार गटाच्या अर्चना पाटील या दीर भावजयीत लढत.  माढा : शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपचे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत. ही लढत मोहिते पाटील घराण्याचे अस्तित्व ठरवणारी असेल.  सांगली : भाजपचे संजयकाका पाटील, उद्धवसेनेचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेस बंडखोर विशाल पाटील अशा तीन पाटलांमध्ये तिरंगी लढत.    सातारा : भाजपचे उदयनराजे भोसले यांच्याविरोधात शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी लढत. उदयनराजेंसाठी प्रतिष्ठेची लढत.  कोल्हापूर : शिंदेसेनेचे  संजय मंडलिक यांना काँग्रेसच्या शाहू छत्रपती महाराज यांनी आव्हान दिले आहे. हातकणंगले : स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी, शिंदेसेनेचे धैर्यशील माने आणि उद्धवसेनेचे सत्यजीत पाटील सरुडकर अशी तिरंगी लढत.   

बारामतीकडे सर्वांचे लक्ष बारामतीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार रिंगणात असल्या, तरी खरा संघर्ष शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यातच आहे.

राणेंसाठी अस्तित्वाची लढाईविधानसभेला सलग दोन पराभवांचे धनी ठरलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गची लढाई राजकीय अस्तित्वाची आहे. ते भाजपच्या चिन्हावर प्रथमच लढत आहेत. 

शिंदे यांची पत पणालासोलापूरमध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे विरोधात भाजप आमदार राम सातपुते यांच्यात लढत आहे. प्रणितीचे पिता काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची पत पणाला लागली आहे. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा