Join us  

Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 8:47 AM

ही साडी बनवण्यासाठी किती तास लागले माहितीये का?

Alia Bhatt at Met Gala 2024: आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात भव्य फॅशन इव्हेंट म्हणून ओळख असलेले Met Gala 2024 नुकतेच पार पडले. अभिनेत्री आलिया भटने (Alia Bhatt) या ग्लोबल इव्हेंटमध्ये हजेरी लावली. या इव्हेंटमध्ये सहभागी होण्याची ही तिची दुसरी वेळ. यंदा आलियाने केलेल्या लूकवरुन कोणाचीच नजर हटत नाहीए. आलियाने अतिशय सुंदर साडी परिधान करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. भारतीय संस्कृतीचं प्रतिनिधित्व केल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मेट गाला २०२४ मध्ये यावर्षी 'द गार्डन ऑफ टाइम' अशी थीम होती. आलियाने सब्यासाची डिझाईन साडी परिधान केली. यावर हाताने फुलांची शिवण करण्यात आली आहे आणि संपूर्ण साडी हँडस्टिच्ड आहे. मौल्यवान ज्वेलरीमुळे या लूकला आणखी झळाळी मिळाली. फ्रिंजेस 1920 ची फ्रिंज स्टाईल तिने केलेली दिसत आहे. साडीत वेगवेगळे रंग आहेत. पृथ्वी,आकाश आणि समु्द्र यांना दर्शवणारे रंग साडीत आहेत जे निसर्गाचं सौंदर्य दाखवतात. या साडीसोबत तिने जो ब्लाऊज घातला आहे तोही अतिशय आकर्षक आहे. याला डबल फ्रील मेगा लेंथ स्लीव्ह्ज आहेत. मागून ब्लाऊज डीप नेक आहे आणि शेवटी एक सुंदर बो बनवण्यात आला आहे.

साडी बनवण्यासाठी लागला इतक्या तासांचा वेळ

163 जणांनी मिळून ही साडी तयार केली आहे. यासाठी त्यांना एकूण 1965 तास लागले अशी माहिती आहे. सब्यसाचीच्या टीमने पुन्हा एकदा कमाल आर्टवर्क केलं आहे. 

आलियाने या साडीत अतिशय आत्मविश्वासाने व्हाईट कार्पेटवर हजेरी लावली. सर्व कॅमेरे तिच्याकडे होते तेव्हा तिच्या मिलियन डॉलर स्माईलवर चाहते पुन्हा फिदा झाले. 'भारतीय राजकुमारी' अशा कमेंट्स चाहते आलियाच्या या पोस्टवर करत आहेत. आलियाने खरोखर एखाद्या राजकुमारीप्रमाणे Met Gala दणाणून सोडले.

टॅग्स :आलिया भटबॉलिवूडमेट गालासब्यसाचीफॅशनआंतरराष्ट्रीय