शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 9:37 AM

Baramati Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होतं आहे. राज्यातील ११ मतदारसंघात मतदान होत आहे.

Baramati Lok Sabha Election 2024 ( Marathi News ): लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होतं आहे. राज्यातील ११ मतदारसंघात मतदान होत आहे. यात बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी अजित पवार यांच्या या निर्णयावर त्यांच्या आईही नाखूश असल्याचा आरोप करण्यात आला होता, या आरोपाला अजित पवार यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. 

रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

आज सकाळीच अजित पवार मतदानासाठी दाखल झाले, यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्रीआशाताई अनंतराव पवार, पत्नी सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. अजित पवार म्हणाले, सगळ्या निवडणुका मी महत्वाच्या मानतो. माझ्या घरात पवार परिवारात सगळ्यात मोठी माझी आई आहे, माझी आई माझ्यासोबत असल्यानंतर बाकीचा काय विचार करता, मेरी माँ मेरे साथ है, असंही अजित पवार म्हणाले.

"माझ्या भावाने दहा वर्षापूर्वी मिशी काढली, आता तो मी मिशी काढण्याची वाट बघत आहे. अजून काय काय वाट बघतोय ते मी पाहणार आहे, असा टोलाही अजित पवार यांनी श्रीनिवास पवार यांना लगावला. रोहित पवार यांच्या आरोपावर बोलताना अजित पवार म्हणाले,पैसे त्यांनी वाटले आहेत, असले आम्ही कधीच केलेले नाही. 

बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान, अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती.यावेळी त्यांनी पवार कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे अजित पवारांची आई नाराज झाल्याचेही त्यांनी सांगितले. 'माझा मुलगाही मला प्रिय आहे आणि दीरही तितकेच प्रिय आहेत. मला तुमच्या दोघांच्या लढाईत पडायचे नाही, असे अजितदादांच्या आईने सांगितले आणि आई बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेली, असा आरोप केला होता. दरम्यान, आज अजित पवार यांनी या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sharad Pawarशरद पवारbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४