शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा घाटावर लखलखाट...

By admin | Updated: November 15, 2016 23:48 IST

भिलवडीत दीपोत्सव : वसंतदादा जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त उपक्रम

भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील ऐतिहासिक कृष्णा घाटावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. लक्ष-लक्ष ज्योतींनी उजळलेला कृष्णाघाट पाहण्यासाठी भिलवडी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सहकारमहर्षी पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भिलवडीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतदादांचे सहकारी आनंदराव मोहिते व माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आनंदराव मोहिते, सुभाष कवडे, संजय पाटील यांनी वसंतदादांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. शितोळ ठाणे उद्ध्वस्त करून मराठा सैन्याने दगड बैलगाडीतून आणून भिलवडी येथे भव्य, विस्तीर्ण व वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असणारा घाट व गावाभोवती वेस बांधली. हा घाट मराठी राज्यसत्तेच्या ऐतिहासिक विजयाचे प्रतीक म्हणून परिचित आहे. चॅलेंजर्स ग्रुप व कुडो कराटे असोसिएशनच्या सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी दीपोत्सवाचे नियोजन केले होते. शेकडो दिव्यांनी भिलवडीचा ऐतिहासिक कृष्णाघाट उजळून गेला होता. यावेळी दक्षिण भाग भिलवडी विकास सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी सरपंच शहाजी गुरव, विलास पाटील, बाबासाहेब मोहिते, चंद्रकांत पाटील, अधिकराव पाटील, दीपक पाटील, बाळासाहेब मोहिते, रमेश पाटील, सुधीर सावंत, बाळासाहेब मोरे, पांडुरंग टकले, प्रकाश चौगुले, मोहन तावदर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)