शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime News: खेळण्यातील पिस्तूलच्या धाकाने केले अपहरण; मिरजेत पाचजणांविरुद्ध गुन्हा, एकजण पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 13:17 IST

मोबाइलद्वारे ९८ हजारांची फसवणूक 

मिरज : मिरजेतील राजीव मार्टीन देवासिया (वय ५४) रा. समतानगर चौगुले प्लॉट मिरज यांचे दुचाकीवरून अपहरण करून धारदार हत्यार व खेळण्यातील पिस्तूलचा धाक दाखवत मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. पाचजणांनी राजीव यांच्या मोबाइलमध्ये जबरदस्तीने ॲप इन्स्टॉल करून ९८ हजार रुपये ऑनलाइन लंपास केल्याची तक्रार आहे.

मिरजेतील समतानगर येथील वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करणारे राजीव देवासिया यांना दोन दुचाकीवरून आलेल्या पाचजणांनी सांगली रस्त्यावरून राजीव यांच्या दुचाकीवरून जबरदस्तीने त्यांना बामणी येथे नदीजवळ नेले. (एमएच १० सीडी ०७५४) दुचाकीवरील रितेश कुरणे याने चाकूसारख्या धारदार हत्याराचा व बनावट पिस्तूलचा धाक दाखवून राजीव यांच्याकडील मोबाइल, आधारकार्ड व पॅनकार्ड लतीफ खाजा शेख याच्याकडे देण्यास भाग पाडले.

यावेळी दुचाकी (एमएच १० एआर ९९२२) वरून आलेले व वाहिद मुल्ला, राजेश गुजराथी, राहील शेख यांनी राजीव यांना शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. लतीफ शेख याने राजीव यांच्या मोबाइलमध्ये ‘क्रेडिटबी’ ॲप जबरदस्तीने इन्स्टॉल करून त्यांच्या नावावर कर्ज मंजूर करून घेतले. गुगल-पे अकाऊंटवरून ९८ हजार रुपये लडमन जोएबशान इकबाल हुसेन यांच्या खात्यावर ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूक केली. त्यानंतर राजीव यांना परत पाठवून दिले.

याप्रकरणी राजीव मार्टिन यांनी गांधी चौक पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. आरोपी रितेश कुरणे, लतीफ खाजा शेख, वाहिद मुल्ला, राजेश गुजराथी व राहील शेख (सर्व रा. माणिकनगर, मिरज) या पाचजणांविरुद्ध अपहरण व फसवणुकीचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक करण्यात आली. रितेश कुरणे हा पसार आहे. अटक केलेल्या चौघांना न्यायालयाने दि. ७पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे पुढील तपास करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Kidnapping with Toy Gun; Five Booked, One Absconding

Web Summary : Miraj resident kidnapped, robbed of ₹98,000 via forced app install using a toy gun. Four arrested, one at large; police investigate.