शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खरसुंडी देवस्थान ‘अ’ वर्गसाठी निर्णय व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील श्री सिद्धनाथ देवस्थानच्या विकासाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील श्री सिद्धनाथ देवस्थानच्या विकासाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे दरवर्षी येथे येणाऱ्या लाखो भाविकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याचा विचार करुन हे देवस्थान ‘अ’ वर्गात समाविष्ट करुन येथील विकासासाठी पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.

आटपाडी तालुक्यात गुहागर - विजापूर महामार्गावरील भिवघाटपासून काही अंतरावर तीर्थक्षेत्र खरसुंडी सिद्धनाथ देवस्थान आहे. हे हेमाडपंथी मंदिर असून, महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. सांगली जिल्ह्यातील बहुसंख्य आमदार व खासदारांसह राज्यातील लाखो भाविकांचे हे कुलदैवत आहे. वर्षभरात दोन मोठ्या यात्रांनिमित्त खरसुंडीत दहा लाखांवर भाविकांची वर्दळ असते. परंतु, भाविकांसाठी याठिकाणी पुरेशा नागरी सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नेहमीच अनेक अडचणींना समोरे जावे लागते.

याठिकाणी सुसज्ज भक्तनिवास, वाहतूक व्यवस्था, स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय आणि अन्य नागरी सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी हे देवस्थान विकासापासून वंचित आहे.

चौकट

जिल्ह्यातील मंत्री, खासदार व आमदारांनी खरसुंडी देवस्थानच्या सर्वांगिण विकासासाठी या ठिकाणाचा ‘अ’ वर्गात समावेश करून हे देवस्थान इतर देवस्थानांप्रमाणे नावारूपाला आणावे. याठिकाणी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी सुविधा उपलब्ध कराव्यात. खरसुंडी देवस्थानची पश्चिम महाराष्ट देवस्थान समितीमध्ये नोंद करून ‘अ’ वर्गात समावेश व्हावा, अशी आमची मागणी आहे. परंतु, याकडे दर्लक्ष होत आहे.

- लता पुजारी, सरपंच, खरसुंडी