शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

करबुडव्यांना घरपट्टी विभागाचे अभय...

By admin | Updated: June 12, 2015 00:43 IST

लेखापरीक्षणात गंभीर आक्षेप : कमी वसुली, अपहारामुळे बदनाम; दंड लावण्यात कुचराई--लूट पालिका तिजोरीची-३

शीतल पाटील - सांगली -जकात, एलबीटीनंतर उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत म्हणून घरपट्टीकडे पाहिले जाते. मात्र सांगली महापालिकेतील घरपट्टी विभागच गेल्या कित्येक वर्षापासून झोपी गेला आहे. २०१२-१३ या वर्षात थकित २४ कोटीची वसुली करण्याबाबत कसलीही हालचाल या विभागाने केली नसल्याचे स्पष्ट मत लेखापरीक्षकांनी व्यक्त केले आहे. त्यात मिरज विभागात झालेला अपहार, त्यातील कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याच्या प्रकाराने हा विभाग बदनाम झाला आहे. विनापरवाना बांधकामांना दुप्पट दंड आकारण्याऐवजी त्यांना अभय देण्याचे काम या विभागाने केले. परिणामी महापालिकेला कोट्यवधी रुपयांच्या महसुली उत्पन्नापासून वंचित राहावे लागले आहे. मार्च २०१३ अखेर घरपट्टीची २४ कोटी ३१ लाख रुपये थकबाकी होती. या वित्तीय वर्षात चालू मागणी २५ कोटी ५२ लाख व थकबाकी २० कोटी २४ लाख अशी एकूण ४५ कोटी ७६ लाख रुपये होती. त्यापैकी २४ कोटी ३१ लाख रुपये थकित आहे. पंधरा दिवसांच्या आत घरपट्टीची रक्कम न भरल्यास वसुलीच्या खर्चासह त्याची जंगम व स्थावर मालमत्ता ताब्यात घेऊन विक्री करावी व कराची वसुली करावी, अशी अधिनियमात तरतूद आहे. पण महापालिकेने थकबाकीदारांवर कोणतीही कारवाई केली नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे २४ कोटी ३१ लाख रुपयांची रक्कम वसूलपात्र निश्चित केली आहे. थकित मालमत्ता करावर दरमहा दोन टक्के असे नऊ महिन्याचे १८ टक्केप्रमाणे दंड आकारणी करणे अपेक्षित होते. त्यानुसार महापालिकेला दंडापोटी ३ कोटी ६४ लाख ३६ हजार ३७० रुपयांचे उत्पन्न मिळाले असते. पण महापालिकेच्या कर संकलन विभागाने दंडाची आकारणी न केल्याने पालिकेला तीन कोटी ६४ लाखाचा फटका बसला असल्याचे लेखापरीक्षकांनी म्हटले आहे. घरपट्टी विभागाने मापात पाप करताना बांधकाम नियमावलीनुसार परवानगी न घेतलेल्या मालमत्ता धारकांवरही कारवाई केलेली नाही. अशा अवैध बांधकामांवर नियमित मालमत्ता कराच्या दुप्पट दराने दंड लावणे आवश्यक होते. पण पालिकेने त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे ६१७ अवैध बांधकामांचे ७५ लाख ३१ हजार रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. महिला लिपिकाकडून १५ लाखांचा अपहार...मिरजेतील घरपट्टी विभागात एका महिला लिपिकाने १६ चलनांची १५ लाख १७ हजार ७९० रुपये रक्कम बँकेत भरणा न करता अपहार केला होता. या लिपिकाला वसूल रक्कम थेट बँकेत जमा करण्याची मंजुरी कोणी दिली? असा सवालही लेखापरीक्षकांनी उपस्थित केला आहे. पण त्याला घरपट्टी विभागाने समाधानकारक उत्तर दिलेले नाही. शिवाय अपहाराची रक्कम व संबंधित कर्मचाऱ्यावर केलेल्या कार्यवाहीबाबतही लेखापरीक्षकांना माहिती दिलेली नाही. त्यामुळे अपहाराची १५ लाख १७ हजाराची रक्कम वसूल करण्याची शिफारस अहवालात केली आहे.मिरज घरपट्टीचा आणखी एक अजब प्रकार लेखापरीक्षकांनी उघड केला आहे. या विभागाकडील वसुली लिपिकाने मिळकतदारांकडून मे २०१२ मध्ये १० हजाराचा कर वसूल केला. पण ही रक्कम त्याने पालिकेकडे जमा केली नाही. ३१ मार्च २०१३ रोजी त्याने कराची रक्कम जमा केली. तब्बल दहा महिने त्याने ही रक्कम वापरून तात्पुरता अपहार केल्याचा ठपका आहे.