शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

नव्या ट्रॅक्टरखालीच गेला जीव !

By admin | Updated: July 24, 2015 00:38 IST

सिद्धेवाडीतील घटना : शेतकऱ्याच्या मृत्यूने हळहळ; शिकत असताना ताबा सुटून अपघात

सावळज : कष्टातून फुलवलेल्या द्राक्षबागेसाठी मोठ्या हौसेने ट्रॅक्टर आणला, पेढे वाटले आणि दुसऱ्या दिवशी त्याच ट्रॅक्टरने ‘त्यांचा’ जीव घेतला! सिद्धेवाडी (ता. तासगाव) येथील ही घटना अवघ्या परिसराच्या काळजाला चटका लावून गेली. भानुदास पांडुरंग शिंदे (वय ६५) हे त्या शेतकऱ्याचे नाव. गुरुवारी दुपारी नवाकोरा ट्रॅक्टर शिकत असताना त्यावरील ताबा सुटून तो शेजारच्या कालव्यात जाऊन उलटला. त्याखाली सापडून शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. सिद्धेवाडी येथील आतकी मळा परिसरातील भानुदास शिंदे यांची साडेतीन एकर द्राक्षबाग आहे. कष्टाळू व जिद्दी शेतकरी अशी त्यांची ओळख होती. त्यांचे सारे कुटुंबच शेतीत रमले आहे. द्राक्षबागेवर औषध फवारण्यासाठी व शेतीच्या कामांसाठी त्यांनी बुधवारी सांगली येथून नवीन ट्रॅक्टर खरेदी करून आणला होता. सगळे घर आनंदात न्हाऊन निघाले होते. संध्याकाळी नव्या ट्रॅक्टरची पूजा केली. पेढेही वाटले. ट्रॅक्टर आणला खरा; पण तो चालवण्यास येत नसल्याने भानुदास शिंदे यांनी शिकण्याचा निर्धार केला. गुरुवारी दुपारी घराजवळच्या माळावर त्यांनी ट्रॅक्टर शिकण्यास सुरुवात केली; पण ट्रॅक्टरचा अंदाज न आल्यामुळे गांगरून जाऊन अचानक ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलेटर दाबला गेला. ट्रॅक्टरने वेग घेतला आणि जवळच असलेल्या सिद्धेवाडी तलावाच्या पोटकालव्यामध्ये तो दोनवेळा उलटला. ट्रॅक्टरखाली सापडल्यामुळे शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार बघितल्यानंतर नातेवाईक पळत आले. शिंदे बेशुद्ध पडले असतील, असे समजून सावळज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. शिंदे यांची पत्नी, दोन मुले आणि दोन मुलींवर आभाळच कोसळले. दोन्ही मुलींची लग्ने झाली असून, एक मुलगा बाहेरगावी नोकरीस आहे, तर दुसरा शेती करतो. (वार्ताहर)