शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
2
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
3
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
4
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
5
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
6
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
7
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
8
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
9
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
10
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
11
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
12
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
13
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
14
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
15
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
16
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
17
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
18
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
19
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
20
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
Daily Top 2Weekly Top 5

जयंतराव-मदनभाऊ-भाजप एकत्र

By admin | Updated: April 25, 2015 00:07 IST

कदम गट आऊट : सर्वपक्षीय आघाडीत अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक यांची निराशा

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारचा शेवटचा दिवस नाट्यमय राजकीय घडामोडींनी गाजला. एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील व राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी एकत्र येत माजी मंत्री पतंगराव कदम गटाला वगळून सर्वपक्षीय आघाडी केली.
या आघाडीत भारतीय जनता पक्ष, शिवसेनेला स्थान देण्यात आले. दिवसभर चर्चेच्या गुऱ्हाळात अडकलेल्या कदम गटाला या धक्क्यातून सावरण्याची संधीही मिळाली नाही. त्यामुळे कदम गटाचे केवळ चारच उमेदवार रिंगणात उरले आहेत. या आघाडीत माजी मंत्री अजितराव घोरपडे व आमदार शिवाजीराव नाईक गटाची मात्र निराशा झाली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय आघाडीची चर्चा आठवडाभर सुरू होती. राष्ट्रवादीने काँग्रेस, भाजप, शिवसेना यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न चालविले होते. काँग्रेसने भाजपला वगळून राष्ट्रवादीशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली होती, तर भाजपमधील आ. विलासराव जगताप यांनी कदम गटाला विरोध केला होता. गेल्या तीन दिवसांपासून सर्वपक्षीय आघाडीच्या चर्चेला वेग आला होता. माजी मंत्री जयंत पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा सुरू केली होती. गुरुवारी सायंकाळपर्यंत सारे काही सुरळीत आहे, असेच वातावरण होते.
सरस्वतीनगर येथील बंगल्यातून जयंत पाटील रात्रभर सूत्रे हलवत होते. पहिल्या टप्प्यात भाजपशी चर्चा पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादीने थेट मदन पाटील यांच्याशी हातमिळवणी केली. भाजपचे आमदार विलासराव जगताप यांनी जयंतरावांचा निरोप मदनभाऊंच्या बंगल्यावर पोहोचवला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या. रात्रभर आ. जगताप यांनी जयंतराव व मदनभाऊ यांच्यातील मध्यस्थाची भूमिका बजावली.
शुक्रवारी सकाळी पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले. मदन पाटील ‘विजय’ बंगल्यातून इच्छुकांची समजूत काढून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना करीत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदेही तेथे थांबून होते, तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांच्या निवासस्थानी जयंत पाटील बैठका घेत होते. सकाळी अकरा वाजता भाजपचे खासदार संजय पाटील, आ. विलासराव जगताप, आ. अनिल बाबर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, राजेंद्रअण्णा देशमुख, दिलीपतात्या पाटील यांची बैठक झाली. बैठकीत प्रत्येक तालुक्यातील इच्छुकांना बोलावून त्यांना अर्ज माघारीचे आदेश देण्यात येत होते. नेत्यांचा आदेश मानून आम्ही अर्ज मागे घेत आहोत, असे सांगताना अनेक इच्छुकांना निराशा लपविता येत नव्हती. दुपारी दोनच्या सुमारास मदन पाटीलही बैठकीत सामील झाले. त्यानंतर उमेदवारी यादी निश्चितीची खलबते सुरू झाली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील काँग्रेस भवनात थांबून होते. ते चर्चेला गेलेच नाहीत. यावेळी काँग्रेसचे इच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या इच्छुकांना अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आले. त्यामुळे इच्छुकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रवादीला सोबत न घेता स्वतंत्र पॅनेल करण्याची मागणीही काही कार्यकर्त्यांनी केली, पण राष्ट्रवादीकडून चर्चेचे निमंत्रण येईल, या आशेवर काँग्रेसचे नेते बसले होते. शेवटपर्यंत सर्वपक्षीय आघाडीकडून कदम गटाला निरोप देण्यात आला नाही.
दुपारी तीन वाजता जयंत पाटील यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. सर्वपक्षीय आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला १४, भाजपला चार, काँग्रेसच्या मदन पाटील गटाला दोन जागा, तर शिवसेनेला एक जागा देण्यात आली. या आघाडीत अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, दिनकर पाटील या भाजपच्या नेत्यांची मात्र निराशा झाली. त्यांच्या गटाला एकही जागा मिळाली नाही.
एक खासदार, एक आमदार, तीन माजी आमदार
- सर्वपक्षीय आघाडीच्या शेतकरी सहकार पॅनेलच्या उमेदवार यादीत खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर यांच्यासह मदन पाटील, विलासराव शिंदे, मानसिंगराव नाईक या तीन माजी आमदारांचा समावेश आहे.
- जतचे आमदार विलासराव जगताप यांचे पुत्र मनोज, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे बंधू संग्रामसिंह, माजी आमदार संपतराव चव्हाण यांचे पुत्र डॉ. पृथ्वीराज, दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे बंधू सुरेश, महांकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे यांचे बंधू गणपती सगरे, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे बंधू उदयसिंह देशमुख अशा सग्यासोयऱ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर पाटील (मांजर्डे) यांच्या पत्नी कमलताई पाटील व माजी अध्यक्ष सिकंदर जमादार यांनाही उमेदवारी मिळाली आहे.
- शिराळ्याचे ज्येष्ठ नेते शंकरराव चरापले यांच्या स्नुषा श्रद्धा चरापले, राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाचे प्रमुख दिलीप तात्या पाटील, ढालगावचे माजी जि. प. सदस्य चंद्रकांत हाक्के, राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार बाळासाहेब व्हनमोरे, सांगलीचे नगरसेवक विष्णू माने यांनाही या आघाडीत संधी मिळाली आहे.
मदनभाऊ - विशाल पाटील आमने-सामने
- मिरज सोसायटी गटातून वसंतदादा घराण्यातील मदन पाटील व विशाल पाटील या चुलत बंधूंमध्ये लढत होत आहे. मागीलवेळी विशाल पाटील यांचा एका मताने सिकंदर जमादार यांनी पराभव केला होता.
- यंदा दोन्ही बंधू एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मदन पाटील यांनी सर्वपक्षीय आघाडीत विशाल पाटील यांच्यासाठी आग्रह धरला होता, पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विशाल यांच्या नावाला विरोध केल्याने त्यांची उमेदवारी कापली गेली.
आर. आर. गटात नाराजी
- आर. आर. पाटील यांच्या गटाला सर्वपक्षीय आघाडीत चार जागा मिळाल्या. त्यात त्यांचे बंधू सुरेश पाटील, बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर पाटील यांच्या पत्नी कमलताई पाटील, कवठेमहांकाळमधून गणपती सगरे व चंद्रकांत हाक्के यांचा समावेश आहे.
- या गटातून मोहन माळी यांच्यासह अनेकजण इच्छुक होते; पण त्यांना अर्ज मागे घेण्यास सांगितल्यानंतर त्यांच्यात निराशा पसरली. माळी यांनी सुरेश पाटील यांना खडे बोलही सुनावले. याच गटातील डी. के. पाटील, अविनाश पाटील, शंकरदादा पाटील यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली. आर. आर. आबा असते, तर असे घडलेच नसते, अशी प्रतिक्रिया उमटत होती.