शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

शेट्टींच्या विकास निधीला जयंत पाटील समर्थकांचा खो

By admin | Updated: November 28, 2015 00:15 IST

राजकीय नाट्य : जुनेखेड मंदिराच्या सभामंडपाचे काम ठप्प

इस्लामपूर : जुनेखेड (ता. वाळवा) येथील धनगर समाजाच्या बिरोबा मंदिराच्या सभामंडपासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या खासदार निधीतून ८ लाख ४२ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी देखभाल, दुरुस्तीचा ठराव न दिल्याने सभामंडपाचे काम रखडल्याचा आरोप स्वाभिमानीचे प्रवक्ते भागवत जाधव यांनी केला.सभामंडपाच्या या कामाला विरोध करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, नवेखेड ग्रामपंचायतीवर आमदार जयंत पाटील समर्थक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सत्ता आहे. या सभामंडप कामाचे भूमिपूजन विधानसभा निवडणुकीपूर्वी जि. प.चे तत्कालीन अध्यक्ष देवराज पाटील यांच्याहस्ते करण्यात आले होते. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नव्या सरकारने पूर्वीच्या आघाडी सरकारकडून मंजूर झालेली विकासकामे रद्द केली. त्यामध्ये जुनेखेड येथील कामाचाही समावेश होता. निधीअभावी सभामंडपाचे काम ठप्प झाले होते. या पार्श्वभूमीवर जुनेखेड येथील धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेऊन सभामंडप कामासाठी निधी देण्याची विनंती केली होती. त्यावर खासदार शेट्टी यांनी २0 सप्टेंबर २0१५ रोजी ८ लाख ४२ हजार रुपयांच्या निधीची शिफारस मंजूर केली. मात्र जुनेखेड ग्रामपंचायतीने हेतुपुरस्सर काम सुरु करण्यासाठी देखभाल, दुरुस्तीचा ठराव दिला नाही. त्यामुळे निधी मंजूर असतानाही, ग्रामपंचायतीच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सभामंडपाचे काम सुरु झालेले नाही. (वार्ताहर)जुनेखेड येथील बिरोबा मंदिराच्या सभामंडपासाठी आमदार जयंत पाटील यांच्या निधीतून ९ लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायतीस मिळाला आहे. थोड्याच दिवसात या सभामंडपाचे काम सुरु करणार आहोत.- सौ. अनिता सतीश पाटील, सरपंच, जुनेखेड.जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारँमंदिराच्या सभामंडपावरुन सध्या राजकीय वाद सुरु आहे. सभामंडपाच्या या कामाला विरोध करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे भागवत जाधव यांनी सांगितले.