सांगलीत जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर समर्थक आमने-सामने; जिल्हा परिषदेबाहेर तुफान घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:29 IST2026-03-18T16:18:50+5:302026-03-18T16:29:10+5:30

सांगली जिल्हा परिषदेवर अखेर महाविकास आघाडीने सत्तास्थापन केली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीत महाविकास आघाडीने बाजी मारली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार संगीत पाटील  विजयी झाल्या आहेत.

Jayant Patil and Gopichand Padalkar supporters face to face; sloganeering erupts outside sangli Zilla Parishad | सांगलीत जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर समर्थक आमने-सामने; जिल्हा परिषदेबाहेर तुफान घोषणाबाजी

सांगलीत जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर समर्थक आमने-सामने; जिल्हा परिषदेबाहेर तुफान घोषणाबाजी

सांगली जिल्हा परिषदेवर अखेर महाविकास आघाडीने सत्तास्थापन केली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीत महाविकास आघाडीने बाजी मारली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार संगीत पाटील  विजयी झाल्या आहेत. या निवडीची मागील काही दिवसांपासून राज्यात चर्चा सुरू होती. अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती.  मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपाचाच अध्यक्ष होणार असा दावा केला होता. दरम्यान, आता या निवडीने भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे. या निवडीनंतर जिल्हा परिषदेसमोर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. यावेळी आमदार जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक एकमेकांसमोर आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. महाविकास आघाडीच्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच दोन्ही गटांमध्ये झालेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे वातावरण तापले होते.

सांगलीत जयंत पाटलांनी पुन्हा एकदा केला 'करेक्ट कार्यक्रम'! भाजपला धोबीपछाड देत जिल्हा परिषदेवर मविआचा झेंडा

जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या विजयाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर गोपीचंद पडळकर इमारतीबाहेर आले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या जयंत पाटील समर्थकांनी त्यांना घेरले आणि घोषणाबाजी सुरू केली. "आता कसं वाटतंय, गार-गार वाटतंय" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. विशेष म्हणजे, पडळकर यांच्या समोरच ही घोषणाबाजी सुरू राहिल्याने वातावरण अधिकच चिघळले.

जिल्हा परिषदेच्या आवारात गोंधळ

सुरुवातीला शांत असलेल्या पडळकर समर्थकांनीही नंतर आक्रमक पवित्रा घेतला. जयंत पाटील समर्थकांच्या घोषणांना पडळकर समर्थकांनीही प्रति-घोषणांनी उत्तर दिले. दोन्ही बाजूने कार्यकर्ते भिडण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त दोन्ही बाजूच्या समर्थकांना बाजूला केले.

Web Title : सांगली में जयंत पाटिल और गोपीचंद पाडलकर समर्थक आमने-सामने, नारेबाजी!

Web Summary : सांगली जिला परिषद चुनाव में महा विकास अघाड़ी की जीत। जयंत पाटिल और गोपीचंद पाडलकर के समर्थक भिड़े, जिसके परिणामस्वरूप जोरदार नारेबाजी हुई। तनाव बढ़ने के बाद पुलिस ने स्थिति को नियंत्रित किया।

Web Title : Clash in Sangli: Jayant Patil, Gopichand Padalkar Supporters Face Off

Web Summary : Maha Vikas Aghadi won Sangli Zilla Parishad election. Jayant Patil and Gopichand Padalkar's supporters clashed, resulting in intense sloganeering. Police intervened to control the situation after heightened tensions arose.