शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

जयंत आठवले यांना ‘अंनिस’चे आव्हान

By admin | Updated: October 1, 2015 23:14 IST

चमत्कार सिध्द करून दाखवा : गंभीर दखल घेणार

सांगली : सनातन संस्थेचे डॉ. जयंत आठवले गेली अनेक वर्षे अध्यात्माचा प्रचार करण्याचा दावा करीत असले तरी, अध्यात्म व धर्माच्या नावाखाली ते अंधश्रध्दा पसरविण्याचे काम करीत आहेत. त्यांनी चमत्काराचे दावेही केले असून, ते चमत्कार सिध्द करून दाखवावेत, असे आव्हान अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. प्रदीप पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिले. डॉ. आठवले यांनी चमत्कार सिध्द न केल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. पाटील म्हणाले की, डॉ. जयंत आठवले अध्यात्माचा प्रचार करण्याचा दावा करतात. त्यांनी चमत्काराचे दावे केले आहेत. डॉ. आठवले यांच्या देहातून सुगंधाची निर्मिती होते, ते बोलत असताना आश्रमातील सर्वांच्या तोंडातील लाळ गोड होते, पोटाचे विकार, संधिवात, अपंगत्व आदी शारीरिक आजार विभुती फुंकून व गोमूत्र शिंपडून बरे होतात, केवळ वास्तूच नव्हे, तर दुचाकी, चारचाकी वाहनांचीही शुध्दी करता येते, आदी प्रचार करण्यात येतो. हे सर्व चमत्कार दैवी असून ते खुद्द डॉ. आठवले करतात वा घडवून आणतात, असा त्यांचा दावा आहे. हे सर्व चमत्काराचे दावे त्यांचेच असल्याने, ते सिध्द करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. अंधश्रध्दा निर्मूलन समिती गेली २५ वर्षे चमत्कार सिध्द करण्याचे आव्हान देत आली आहे. कोणताही दैवी चमत्कार अस्तित्वात नसल्याबाबत ‘अंनिस’तर्फे वारंवार प्रबोधन करूनही, जर कोणी चमत्काराचा दावा करत असल्यास, तो सिध्द करावा. आमचे आव्हान स्वीकारण्यास तयार असल्यास त्या आशयाचा मसुदा देण्यास ‘अंनिस’ तयार आहे, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले. यावेळी अ‍ॅड. चंद्रकांत शिंदे, ज्योती आदाटे, प्रियांका तुपलोंढे, राणी कदम, कौस्तुभ पोळ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)