शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: अग्निशमन अधिकाऱ्यावर सुपारी घेऊन खुनी हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न, आणखी दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 18:14 IST

फर्मला काळ्या यादीत टाकल्यामुळे कृत्य

सांगली : महापालिकेचे प्रभारी अग्निशमन अधिकारी सुनील माळी (वय ४१, रा. कलानगर, सांगली ) यांच्यावर दीड महिन्यांपूर्वी झालेला खुनी हल्ला सुपारी देऊन केल्याचे पोलिस तपासांत निष्पन्न झाले आहे. संशयित मलिक सलीम शेख (रा. राजावत कॉलनी, दत्तनगर, बामणोली, ता. मिरज) आणि अभिजीत अनिलकुमार चव्हाण (रा. कमला निवास, राममंदिर चौक सांगली) या दोघांना अटक केली आहे. चव्हाण याच्या फर्मला काळ्या यादीत टाकल्याने त्याने माळी यांना जीवे मारण्याची सुपारी मुख्य संशयित मलिक शेख याला दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित अभिजीत चव्हाण यांचे रसिका मार्केटिंग आणि जीएलसी ग्रुप ऑफ फायर ॲन्ड सेफ्टी इंजिनिअर्स नावाच्या दोन फर्म आहेत. फर्मच्या परवाना मुदतीमध्ये खाडाखोड केल्याचा प्रकार निदर्शनास आला होता. त्यामुळे अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांनी या दोन्ही फर्मला काळ्या यादीत टाकले होते. त्याचा अभिजीत चव्हाण यास राग होता. 

त्यामुळे त्याने गुन्ह्यातील मुख्य आरोपी मलिक शेख यास अधिकारी सुनील माळी यांना जीवे मारण्याची सुपारी दिली होती. त्यानुसार संशयित प्रथमेश सुरेश पाटोळे (२३, रा. झील शाळेच्या पाठीमागे, दत्तनगर, बामणोली), तोहिद ऊर्फ हुसेन फारुख सुतार (१९, रा. हांडे गल्ली, दत्तनगर, बामणोली, कुपवाड), डी. माया ऊर्फ शुभम आनंदा पारचे (रा. चाणक्य चौक, सांगली) यांच्यासह मलिक शेख अशा चौघांनी माळी यांच्यावर पाळत ठेवली होती. माळी कधी बाहेर पडतात कधी घरी परत येतात याची माहिती चौघांनी काढली होती.

दि. २७ जानेवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास फिर्यादी शंकर बाजीराव जगदाळे (रा. दत्तमंदिरनजीक, पद्माळे, ता. मिरज) हे अधिकारी माळी यांना घेऊन दुचाकीवरून कलानगर येथील माळी यांच्या घरासमोर आले होते तेव्हा हल्लेखोर तेथेच दबा धरून बसले होते. माळी दुचाकीवरून खाली उतरताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार चाकूने बरगडीत वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, माळी यांनी आरडाओरड केल्याने हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते. छातीवर वार झाल्याने माळी खाली कोसळले.

गंभीर जखमी झालेल्या माळी यांना नागरिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून प्रथमेश पाटोळे आणि तोहिद सुतार या दोघांना अटक केली होती. दोघांची कसून चौकशी करण्यात आली होती तसेच इतर पुरावे गोळा करण्यात आले. तपासात सुपारी देऊन खुनी हल्ला केल्याचे स्पष्ट झाले.

शहर पोलिस निरिक्षक अरुण सुगावकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक सागर होळकर यांना पसार झालेल्या दोघा संशयितांना अटक करण्याचे निर्देश दिले होते. पथकातील संदिप पाटील, गौतम कांबळे, संतोष गळवे यांना मुख्य आरोपी मलिक शेख हा विष्णुअण्णा फळ मार्केट येथे येणार असल्याची माहिती मिळाली. परिसरात सापळा रचून पोलिसांनी शेख यास अटक केली. चौकशी केल्यानंतर त्याने अभिजीत चव्हाण याने माळी यांच्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी चव्हाण याला देखील अटक केली.

संशयितांकडून दिशाभूल

माळी यांच्यावर हल्ला केल्यानंतर दोघा संशयितांना सीसीटीव्ही फुटेजवरून ताब्यात घेतले. दोघांची कसून चौकशी करताना त्यांनी वेगवेगळी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांनी खरे कारण शोधून काढले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Fire officer attack was a hit job; two arrested.

Web Summary : Sangli fire officer Sunil Mali's attack was a contract killing. Abhijit Chavan, blacklisted by Mali, hired Malik Sheikh. Police arrested both after finding evidence connecting them to the crime.