शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 23:46 IST

संशयित जुळेवाडीचा, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगलीसह कर्नाटकात दुचाकी चोरणाऱ्या फिरोज नबीलाल मुल्ला (वय ३१, रा. मानुगडे गल्ली, जुळेवाडी, ता. तासगाव) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून २१ दुचाकी, एक मोटार असा १६ लाख १० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

जुळेवाडी येथील फिरोज मुल्ला याने तीन-चार महिन्यापासून दुचाकी चोरण्याचा सपाटाच लावला होता. एसटीमधून कोठेही जायचा. तेथून येताना दुचाकी चोरून घेऊन यायचा. त्यानंतर दहा ते पंधरा हजार रूपयांना दुचाकी वापरण्यास देत होता. कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगलीसह कर्नाटकातील विजयपूर येथून त्याने दुचाकी चोरल्या होत्या. तरीही तो पोलिसांना सापडला नव्हता.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील मच्छिंद्र बर्डे, सतीश माने यांना जुळेवाडी येथील फिरोज मुल्ला याने काही दुचाकी चोरल्या असल्याची माहिती मिळाली. तो पाचवा मैल येथे दुचाकीवरून येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. काहीवेळाने तो आल्यानंतर संशयावरून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर चाव्यांचा जुडगा आढळून आला. चाव्याबाबत विचारणा करून त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली. कसून चौकशी केल्यानंतर त्याने कुपवाड एमआयडीसी येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच गेल्या चार महिन्यात गांधीनगर, रेल्वे स्थानक, मलकापूर, कराड, कुपवाड, मिरज, कासेगाव, पंढरपूर तसेच कर्नाटकातील विजयपूर येथून दुचाकी चोरल्याचे सांगितले.

पोलिस पथकाने त्याच्याकडून २१ दुचाकी आणि एक मोटार असा १६ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याला कुपवाडमधील चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पवार, कर्मचारी सागर लवटे, नागेश खरात, दरिबा बंडगर, सागर टिंगरे, संदीप नलवडे, अमिरशा फकीर, संदीप गुरव, अनिल कोळेकर, अमर नरळे, उदयसिंह माळी, महादेव नागणे, विक्रम खोत, केरूबा चव्हाण, गणेश शिंदे, अभिजीत पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बसने जाऊन चोरी

फिरोज मुल्ला याने चार महिन्यापासून दुचाकी चोरण्यास सुरूवात केली होती. चोरी करण्यासाठी तो कोठेही बसने जात होता. त्याच्याजवळ असलेल्या चाव्यांच्या जुडग्यातून एखादी दुचाकी चोरल्यानंतर ती घेऊन परत येत होता.

दुचाकी गहाण आल्याचे सांगून द्यायचा

फिरोज मुल्ला हा सावकारी करत असल्याचे भासवत होता. त्याच्याकडे दुचाकी गहाण आल्याचे सांगून तो दहा ते पंधरा हजार रूपयात कोणालाही देत होता. त्यामुळे कागदपत्रे, मालकी याबाबत कोणीही विचारणा करत नव्हते. गुन्हे अन्वेषणने त्याला पकडल्यानंतर पहिल्यांदाच तो पोलिस रेकॉर्डवर आला.

टॅग्स :SangliसांगलीArrestअटकPoliceपोलिस