शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपनीस ५० लाखांना गंडा घालण्याचा प्रयत्न

By admin | Updated: June 4, 2015 00:01 IST

तीन डॉक्टरांसह सहाजणांवर गुन्हा

कोल्हापूर : मृत व्यक्तीच्या नावे विमा पॉलिसी काढून खासगी विमा कंपनीची सुमारे ५० लाख रुपयांना फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहाजणांवर लक्ष्मीपुरी पोलिसांत बुधवारी गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये तीन डॉक्टरांचा समावेश आहे. सचिन बाबूजी मछले (रा. ई वॉर्ड, एस. एस. सी. बोर्ड, मोतीनगर, कांजरभाट वसाहत, कोल्हापूर), डॉ. वर्षा व्ही. बारगे (रा. विश्वेश्वरी क्लिनिक, करवीर), बिनाबाई सुनील भट (रा. तोरणानगर, शहापूर, इचलकरंजी), डॉ. श्रीराम सावंत (रा. राजेश्वरीनगर, इचलकरंजी), कल्पना शिवाजी सोनुले (रा. महात्मा फुले मातंग वसाहत, कागल, जि. कोल्हापूर), डॉ. सागर पाटील (रा. साके, ता. कागल) अशा सहा संशयितांवर गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद विमा कंपनीसाठी तपास करणाऱ्या पुणे येथील डी. एस. आर. इन्व्हेस्टिगेशन कंपनीचे खासगी तपास अधिकारी सतीश दामोदर नारे (वय ३६, रा. कृषिनगर, पोतदार शाळेजवळ, जि. अकोला) यांनी दिली.पोलिसांनी सांगितले की,सुनील फोनसिंग भट (३४, रा. तोरणानगर, शहापूर, इचलकरंजी) हे मृत असून त्यांचे वारस बिनाबाई सुनील भट हे आहेत. सुनील भट हे ११ एप्रिल २०१३ ला मृत झाले असताना त्याऐवजी डॉ. श्रीराम सावंत याने २१ सप्टेंबर २०१४ रोजी सुनील भट हे मृत झाल्याचा मृत्यूचा दाखला दिला. तिसऱ्या प्रकरणात संदीप शिवाजी सोनुले (२४, रा. महात्मा फुले मातंग वसाहत, कागल) यांची बहीण कल्पना शिवाजी सोनुले या एका पॉलिसीला वारस आहेत. संदीप सोनुले हे १२ फेबु्रवारी २०१४ रोजी मृत असताना साकेतील मंगल आनंद क्लिनिकचा डॉ. सागर पाटील याने १ जानेवारी २०१५ रोजी संदीप सोनुले यांचा मृत्यू दाखला दिला आहे. तपास कंपनीने या तिघांच्या पॉलिसी तपासल्या असता सतीश नारे यांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर नारे यांनी बुधवारी या सहाजणांविरोधात फिर्याद दिली. या सर्वांनी संगनमतने कंपनीची सुमारे ५० लाखांंची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)