शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

वाळवा-शिराळ्यात पुन्हा संस्थात्मक बांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या सहकारी संस्था सक्षमपणे चालविल्या आहेत. मात्र विरोधी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या सहकारी संस्था सक्षमपणे चालविल्या आहेत. मात्र विरोधी गटातील अवस्था उलटी आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा सहकारी चळवळीला ताकद देऊन सर्व क्षेत्रातील संस्था उभ्या करण्यासाठी नेते धडपडत आहेत.

वाळवा, शिराळ्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीन सहकारी साखर कारखाने आहेत. त्यांची ताकद मोठी आहे. शैक्षणिक संस्थांचे जाळे, राजारामबापू दूध संघ, बँक, सूतगिरणी आदी संस्थात्मक ताकद. याउलट त्यांच्याविरोधात असलेल्या राहुल महाडिक, सम्राट महाडिक आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याकडे शैक्षणिक संस्था आहेत. महाडिक बंधू सहकारी तत्त्वावर दूध व्यवसायाकडे झुकले आहेत; तर माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे शैक्षणिक संकुलन उभे करत आहेत. इस्लामपूूर मतदारसंघात शहरीपासून ते ग्रामीणपर्यंत राष्ट्रवादीच्या माध्यमातून सहकारी संस्थांचे जाळे भक्कम आहे. हीच ताकद जयंत पाटील यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्यांचे राजकीय बलस्थान आहे.

शिराळा मतदारसंघात आमदार मानसिंगराव नाईक यांचे नेतृत्व आणि संस्थात्मक ताकद मोठी आहे. त्यांच्या विरोधात नेहमीच असलेले माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी स्थापन केलेल्या संस्था पुन्हा भक्कम करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शिवाजी केन प्रोसेस, यशवंत ग्लुकोज आदी संस्थांचा समावेश आहे, तर डोंगरी भागाचे नेतृत्व करणारे माजी मंत्री शिवाजीराव देशमुख यांनी काँग्रेसच्या ताकदीवर करुंगली (कोकरूड) येथे निनाई सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. सध्या हा कारखाना दालमिया भारत शुगर यांच्याकडे आहे. त्यामुळे सहकारी चळवळीतील देशमुख गटाची ताकद कमी झाली. परंतु शैक्षणिक क्षेत्रात मात्र त्यांचे योगदान आजही टिकून आहे. सत्यजित देशमुख आगामी काळात ५ ते ६ कोटींचा नवीन प्रकल्प उभा करण्याच्या तयारीत आहेत. एकंदरीत राष्ट्रवादीच्या विरोधातील नेते सहकारी संस्थांची पुन्हा बांधणी करून स्वत:ची राजकीय ताकत वाढवित आहेत.

फोटो- ०२०२२०२०१-आयएसएलएम-इस्लामपूर न्यूज

शिवाजीराव नाईक, सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख, राहुल महाडिक, सम्राट महाडिक.