शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मदनभाऊ गटाचा स्वतंत्र झेंडा

By admin | Updated: November 15, 2016 00:33 IST

प्रदेशाध्यक्षांसमोर प्रकार : ना कदम गटाचे, ना दादा गटाचे, आम्ही सर्व भाऊ गटाचे!

सांगली : दादा व कदम गटातील वाद मिटविण्यासाठी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या बैठकीत मदनभाऊ गटाने अस्तित्वाचा स्वतंत्र झेंडा फडकवला. पक्षातील वाद मिटवून एकसंधपणे कॉँग्रेसची वाटचाल व्हावी, अशी अपेक्षा ते व्यक्त करू लागल्यानंतर गटबाजीतून सुरू असलेल्या कुरघोड्यांचे खरे स्वरूप त्यांच्यासमोर उघड झाले. सांगली-मिरज रस्त्यावर पोलिस मुख्यालयाजवळील एका हॉटेलमध्ये रविवारी अशोक चव्हाण यांनी गटबाजीचे राजकारण संपविण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीस दादा व कदम गटातील नेते, कार्यकर्ते तसेच मदनभाऊंच्या गटातील महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील, राजेश नाईक यांच्यासह सहा ते सातजण उपस्थित होते. दोन्ही गटातील नेत्यांचे म्हणणे ऐकून घेत असताना, चव्हाण यांनी महापौर व अन्य नगरसेवकांना ‘तुम्ही कोणत्या बाजूने आहात’, असा सवाल केला. महापौर म्हणाले, ‘आम्ही ना दादा गटाचे आहोत, ना कदम गटाचे, आम्ही मदनभाऊंच्या गटातील आहोत. सध्या जयश्रीताई पाटील आमच्या नेत्या आहेत.’ चव्हाण यांनाही या गोष्टीचे आश्चर्य वाटले. गटांमध्ये विभागालेली कॉँग्रेस एकसंध व्हायला हवी, अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली. त्यानंतर गटबाजीच्या राजकारणातून सुरू असलेल्या कुरघोड्यांच्या कहाण्या चव्हाण यांच्यासमोर सर्वांनी मांडल्या. चव्हाण यांना या गोष्टींची कल्पना यापूर्वी होती. तरीही त्यांचे तीव्र स्वरूप त्यांनी या बैठकीत अनुभवले. गेल्या काही दिवसांपासून मदनभाऊ गटाची घुसमट सुरू आहे. कदम गटाशी जुळवून घेतलेल्या मदनभाऊंच्या गटाचे सूर माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, त्यांचे बंधू विशाल पाटील यांच्या गटाशी अद्याप जुळलेले नाहीत. रविवारी वसंतदादा जन्मशताब्दी सोहळ््यावेळीही याच गोष्टीचे दर्शन झाले. जयश्रीतार्इंसह त्यांचा संपूर्ण गट मुख्य कार्यक्रमास गैरहजर राहिला. मदनभाऊ पाटील यांच्या पश्चात या गटाच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी जयश्रीतार्इंचे नेतृत्व स्वीकारले आहे. जयश्रीतार्इंना सक्रिय राजकारणात रस दिसत नसला तरी, कार्यकर्त्यांनी त्यांच्याच नेतृत्वाचा धागा घट्ट पकडला आहे. कदम गटाशी मदनभाऊंनी जुळवून घेतल्यानंतर आजही हा गट कदम यांच्या हाकेला धावून जातो, मात्र प्रतीक पाटील, विशाल पाटील गटाकडे नेहमीच पाठ फिरवितो. वसंतदादांच्या घराण्यातच पडलेले दोन गट एकत्र येण्याची शक्यता फार कमी आहे. जयश्रीतार्इंचे नेतृत्व सुटले, तर विनाकारण मोठी फरफट होईल, अशी भीती मदनभाऊ गटाला आहे. त्यामुळे जयश्रीतार्इंच्या नेतृत्वाला त्यांनीच बळ देण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)नगरसेवकांमध्ये नाराजीजन्मशताब्दी सोहळ्याचे नियोजन करण्यात येत असताना दादा गटाकडून जयश्रीताई पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने मदनभाऊ गटाचे नगरसेवक नाराज झाल्याचे सांगण्यात येते. ही नाराजी त्यांनी उघडपणे चव्हाण यांच्यासमोर बोलूनही दाखविली. त्यामुळेच या गटाने जन्मशताब्दीच्या कार्यक्रमाकडे ठरवून पाठ फिरविली. वसंतदादांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन सर्वजण परतले. उपस्थितीवरून वादकाँग्रेस प्रदेशाध्यक्षांसमोर वसंतदादांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या उपस्थितीवरून वाद झाला. महापौर हारूण शिकलगार यांचे नाव पत्रिकेत असतानाही मुख्य समारंभाला ते गैरहजर राहिले. याचा जाब विचारण्यात आला. तेव्हा महापौरांनी वसंतदादांच्या स्मारकाच्या दर्शनाला उपस्थित होतो. कामानिमित्त सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही, असा खुलासा केला.