अफगाणिस्तानमधून आलेला ६९ लाखांचा ‘इंपोर्टेड’ बेदाणा जप्त; विनापरवाना प्रक्रिया केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 19:47 IST2026-05-14T19:47:28+5:302026-05-14T19:47:57+5:30

यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये मशिनरीच्या सहाय्याने बेदाण्याचे निटिंग, ग्रेडिंग, सॉर्टिंग आणि पॅकिंग सुरू असल्याचे आढळून आले. तसेच शेतकऱ्यांकडून आलेल्या द्राक्षांपासून बेदाणा तयार करण्याची प्रक्रियाही सुरू होती. तपासणीदरम्यान अफगाणिस्तानमधून आयात केलेल्या बेदाण्याचे १० किलो वजनाचे पांढरे बॉक्स आढळले.

Imported Bedana worth Rs 69 lakh from Afghanistan seized; Food and Drug Administration takes strict action against unlicensed processing center | अफगाणिस्तानमधून आलेला ६९ लाखांचा ‘इंपोर्टेड’ बेदाणा जप्त; विनापरवाना प्रक्रिया केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई 

अफगाणिस्तानमधून आलेला ६९ लाखांचा ‘इंपोर्टेड’ बेदाणा जप्त; विनापरवाना प्रक्रिया केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई 


सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोची येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धडक कारवाई करत सुमारे ६९ लाख १७ हजार ५९६ रुपये किमतीचा २६ हजार ६ किलो आयात केलेला बेदाणा जप्त केला. जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने १२ मे रोजी चोरोची येथील मे. अजितकुमार पाटील बेदाणा प्रोसेसिंग सेटरची तपासणी केली.

यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये मशिनरीच्या सहाय्याने बेदाण्याचे निटिंग, ग्रेडिंग, सॉर्टिंग आणि पॅकिंग सुरू असल्याचे आढळून आले. तसेच शेतकऱ्यांकडून आलेल्या द्राक्षांपासून बेदाणा तयार करण्याची प्रक्रियाही सुरू होती. तपासणीदरम्यान अफगाणिस्तानमधून आयात केलेल्या बेदाण्याचे १० किलो वजनाचे पांढरे बॉक्स आढळले. चौकशीत हा माल दिल्ली येथील ‘देव इम्पेक्स’ या पेढीकडून आयात करण्यात आल्याचे समोर आले. न्हावा शेवा पोर्टमार्गे हा माल मिरज तालुक्यातील मालगाव येथील ‘देव इम्पेक्स’च्या नावावर आणण्यात आला होता.

मात्र, हा माल प्रक्रिया करण्यासाठी चोरोची येथील विनापरवाना पेढीकडे का पाठविण्यात आला, याबाबत कोणतीही कागदपत्रे किंवा समाधानकारक माहिती उपलब्ध झाली नाही. याशिवाय आयात केलेल्या बेदाण्याच्या गुणवत्तेबाबत कोणताही विश्लेषण अहवाल नसल्याचेही तपासात स्पष्ट झाले. संबंधित प्रोसेसिंग सेंटरकडे अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार नोंदणी अथवा परवानाही नसल्याचे निदर्शनास आले. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर संबंधित इंपोर्टेड बेदाणा कायद्यातील मानकांनुसार नसल्याचा संशय व्यक्त करत ६९ लाखांहून अधिक किमतीचा २६ हजार ६ किलो बेदाणा जप्त करण्यात आला.

अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी अन्न चाचणी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सहायक आयुक्त नि. सु. मसारे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्र. ने. जिनगर, अ. अ. पवार आणि सु. स. खांडेकर यांनी ही कारवाई केली.

Web Title : महाराष्ट्र में 69 लाख रुपये के आयातित किशमिश जब्त, अवैध प्रसंस्करण का भंडाफोड़।

Web Summary : खाद्य एवं औषधि प्रशासन ने सांगली जिले में अवैध रूप से आयातित 69 लाख रुपये की अफगानी किशमिश जब्त की। किशमिश में उचित दस्तावेज और गुणवत्ता विश्लेषण का अभाव था, जिससे सार्वजनिक स्वास्थ्य संबंधी चिंताएँ बढ़ गईं। आगे की जांच जारी है।

Web Title : ₹6.9 Million Imported Raisins Seized in Maharashtra; Illegal Processing Busted.

Web Summary : Food and Drug Administration seized ₹6.9 million worth of illegally imported Afghan raisins in Sangli district. The raisins lacked proper documentation and quality analysis, raising public health concerns. Further investigation is underway.

टॅग्स :Sangliसांगली