मिरजेत बेकायदेशीरपणे दारू विकणाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:25 IST2021-04-11T04:25:17+5:302021-04-11T04:25:17+5:30

सांगली : मिरज येथील गुरुवार पेठ परिसरात घरासमोर रिक्षा लावून त्यातून देशी दारूची विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण ...

Illegal liquor dealers arrested in Miraj | मिरजेत बेकायदेशीरपणे दारू विकणाऱ्यांना अटक

मिरजेत बेकायदेशीरपणे दारू विकणाऱ्यांना अटक

सांगली : मिरज येथील गुरुवार पेठ परिसरात घरासमोर रिक्षा लावून त्यातून देशी दारूची विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. दाऊदअली जंगलीसाहब गदककर व महंमदअली जंगलीसाहब गदककर (दोघेही रा. लोंढे गल्ली, गुरुवार पेठ, मिरज) अशी संशयितांची नावे असून त्यांच्याकडून देशी दारूसह वाहन असा ७९ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक मिरज शहरात गस्तीवर असताना, उपनिरीक्षक अभिजित सावंत यांना माहिती मिळाली की, गदककर बंधू रिक्षामधून दारू विक्री करत आहेत. त्यानुसार पथक गेले असता, तिथे दोघे रिक्षात बसून दारू विक्री करत असल्याचे दिसून आले.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये दुकाने उघडण्यास परवानगी नसल्याने दायची जादा दराने विक्री करत असल्याचे दोघांनी सांगितले. त्यांच्याकडून दारूच्या बाटल्या, रोख रक्कम व रिक्षा असा ७९ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यांना मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजित सावंत, मुद्दसर पाथरवट, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Illegal liquor dealers arrested in Miraj