मिरजेत हाॅटेल व्यावसायिकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:30 IST2021-08-20T04:30:42+5:302021-08-20T04:30:42+5:30

मिरज : मिरजेतील पाटील हौद जैन बस्ती येथील अमित ऊर्फ पिन्या चारुदत्त चौगुले (वय ३२) या हाॅटेल व्यावसायिकाने राहत्या ...

Hotel businessman commits suicide in Miraj | मिरजेत हाॅटेल व्यावसायिकाची आत्महत्या

मिरजेत हाॅटेल व्यावसायिकाची आत्महत्या

मिरज : मिरजेतील पाटील हौद जैन बस्ती येथील अमित ऊर्फ पिन्या चारुदत्त चौगुले (वय ३२) या हाॅटेल व्यावसायिकाने राहत्या घरात विषारी द्रव्य प्राशन करून बुधवारी रात्री आत्महत्या केली.

शनिवार पेठेतील शांतिभुवन हॉटेलचे चालक अमित चाैगुले काही वर्षांपासून हॉटेल व्यवसाय करत होते. हा व्यवसाय बंद झाल्याने ते कर्जबाजारी झाले होते. आर्थिक विवंचनेतून अमित यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याची चर्चा होती. विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर नातेवाईकांनी अमित यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अमित यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले आहेत. अमित याच्या मृत्यूने पाटील हौद परिसरात हळहळ व्यक्त होत होती. याबाबत मिरज शहर पोलिसांत नोंद आहे.

Web Title: Hotel businessman commits suicide in Miraj