शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
4
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाची पहिली महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
5
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
6
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
7
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
8
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
9
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
10
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
11
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
12
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
13
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
14
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
15
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
16
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
17
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
18
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
19
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
20
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: झरेतील जिल्हा बँकेवर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, सव्वातीन कोटींचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:37 IST

बांबवडेच्या तरुणाने टीप दिल्याने टोळी दाखल

सांगली : झरे (ता. आटपाडी) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे लॉकर गॅस कटरने कापून दागिने लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. राहुल रंजमीश शर्मा (वय २७, रा. ककराला, जि. बदायू, उत्तर प्रदेश), विश्वजित विजय पाटील (२४, रा. बांबवडे, ता. पलूस), संकेत अरुण जाधव (२६, रा. बलवडी, ता. खानापूर), इजाज राजू अत्तार (३०, रा. आमणापूर, ता. पलूस) या चौघांना अटक करून सोन्या-चांदीचे दागिने, जीप, गावठी पिस्तूल, असा सव्वातीन कोटींचा मुद्देमाल जप्त केला.

जिल्हा बँकेच्या झरे शाखेत ७ जानेवारी रोजी रात्री खिडकीची काच फोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आतील २२ सेफ डिपॉझिट लॉकर कटरने तोडून ग्राहकांनी ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी चोरून नेली. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या. अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक पंकज पवार व सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांची दोन पथके चोरट्यांच्या मागावर होती.

चोरट्यांनी बँकेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआरही नेला होता. तपास सुरू असतानाच पलूस येथे एका लॉजवर सात-आठ दिवसांपासून उत्तर प्रदेशातील काहीजण उतरल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन तपास केला. तेव्हा विश्वजित पाटील याचे उत्तर प्रदेशात गलाई दुकान होते. तेथील सराफ दुकानदार राहुल शर्मा साथीदारांना घेऊन आला होता. त्यांना संकेत जाधव, इजाज अत्तार यांनी चोरी करण्यासाठीचे साहित्य पुरविल्याचे समजले. 

पोलीसांनी उत्तर प्रदेशातील ककराळा येथे जाऊन शर्माला सोन्याच्या लगडसह ताब्यात घेतले. त्यानंतर संशयित विश्वजित पाटील, संकेत जाधव, इजाज अत्तार यांना सांगलीवाडीमधून ताब्यात घेतले. पोलिसांनी १ कोटी ५७ लाख ६८ हजारांची सोन्याची लगड, २८ किलो ५०० ग्रॅम चांदीचे दागिने, मूर्ती, ७० लाखांचे सोन्याचे दागिने, १० लाखांची जीप, गावठी कट्टा, रोख ५१ हजार ६०० रुपये, गॅस सिलिंडर असा ३ कोटी २५ लाख, ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हे अन्वेषणचे सागर लवटे, संदीप नलावडे, सागर टिंगरे, रणजित जाधव, अमिरशा फकीर, नागेश खरात, अनिल कोळेकर, अतुल माने, सोमनाथ गुंडे, सतीश माने, मच्छिंद्र बर्डे, दरिबा बंडगर, संदीप गुरव, उदय माळी, अमर नरळे, महादेव नागणे, अरुण पाटील, अमोल कदम, अमोल लोहार, प्रमोद साखरपे, सुनील जाधव, सूरज थोरात, केरुबा चव्हाण, विक्रम खोत, रोहन घस्ते, अभिजित ठाणेकर यांच्या पथकाने कारवाई केली.

चोरीचे सोने वितळवले

संशयित राहुल शर्मा याचे सराफी दुकान आहे. त्याने सोने चोरून नेल्यानंतर ते वितळवले होते. पोलिसांनी त्याच्याकडून १ किलो १६८ ग्रॅम वजनाची १ कोटी ५७ लाख ६८ हजार रुपयांची सोन्याची लगड जप्त केली.

आणखी सात संशयित पसार

गलाई कामगार विश्वजित पाटील याने टीप दिल्यानंतर राहुल शर्मा हा उत्तर प्रदेशातून सात साथीदारांना घेऊन पलूस येथे उतरला होता. चोरी केल्यानंतर सर्वजण पसार झाले. राहुलला अटक केल्यानंतर बाकीचे सात संशयित पसार झाले आहेत. ते रेकॉर्डवरील असून त्यांचा शोध सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Bank Robbery: Gang Arrested, Crores Recovered in Zare Case

Web Summary : Police arrested four in Sangli's Zare bank robbery case, recovering stolen gold, silver, and weapons worth over ₹3.25 crore. The gang used gas cutters to loot lockers; further investigation is ongoing to nab other suspects.