शिराळा आगारात कोरोना नियमांचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:26 IST2021-04-18T04:26:38+5:302021-04-18T04:26:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात मिनी लॉकडाऊन जाहीर केला असल्याने एस.टी.च्या फेऱ्या सुद्धा बंद आहेत. ...

Fuss of corona rules in Shirala depot | शिराळा आगारात कोरोना नियमांचा फज्जा

शिराळा आगारात कोरोना नियमांचा फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात मिनी लॉकडाऊन जाहीर केला असल्याने एस.टी.च्या फेऱ्या सुद्धा बंद आहेत. मात्र, प्रशासनाच्या एका फतव्यामुळे शिराळा एसटी आगारातील ३०० पेक्षा जास्त वाहक, चालक व अधिकारी हजर झाले आहेत. त्यामुळे येथे जमावबंदी तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.

या आगारातून सध्या इस्लामपूर मार्गावर दोनच बस धावत आहेत. त्यामुळे दोन बसचे दोन चालक व दोन वाहक अशा चौघांवर बससेवा सुरू राहू शकते. मात्र, नवीन आदेशात जवळपास १२ हजार किलोमीटर बस धावल्या पाहिजेत, याप्रमाणे चालक-वाहक यांची ड्युटी लावावी, असे सांगितले आहे. त्यामुळे तब्बल ३०० कर्मचारी दररोज हजर राहत आहेत.

यामुळे आगारात सध्या फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. विश्रांतीगृहाची क्षमता ३० कर्मचाऱ्यांची आहे. संध्याकाळी ड्युटी संपल्यावर सही करून बाहेर पडायचे आहे. त्यामुळे दिवसभर हे कर्मचारी आगारात एकाच ठिकाणी बसून असतात. त्यामुळे कोरोनाबाबतचे सर्व नियम धाब्यावर बसवून काम सुरू आहे.

चाैकट

कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

चालक-वाहकांपैकी एखादा कर्मचारी बाधित असेल तर संपूर्ण आगाराला याचा फटका बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही. असे असतानाही आगार व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना एकत्र का केले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Fuss of corona rules in Shirala depot