शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर येथे ‘गुडमॉर्निंग’चा फज्जा

By admin | Updated: June 4, 2015 00:01 IST

कारवाईची गरज : मोकळे भूखंड, शाळेच्या मैदानांचा शौचासाठी वापर

अशोक पाटील -इस्लामपूर शहरातील मुख्य रस्त्याच्या एका बाजूला मोठी शिक्षण संस्था, तर दुसऱ्या बाजूला उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले आहे. या दोन्हीच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या भूखंडाचा वापर परिसरातील नागरिक शौचालय म्हणून करत आहेत. याबाबत पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यापूर्वी पालिकेच्या आरोग्य विभागाने गुडमॉर्निंग पथकाच्या माध्यमातून उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली होती. आता गुडमॉर्निंग पथकेच गायब झाली आहेत.वाळवा तालुक्यातील सर्वच गावे निर्मलग्राम करण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक पातळीवर प्रयत्न करण्यात आले. ग्रामसेवक, तलाठी, तसेच स्थानिक पदाधिकारी यांची पथके तयार करण्यात आली होती. त्यांना ‘गुडमॉर्निंग पथक’ असे नाव देण्यात आले होते. ही पथके दररोज पहाटे तालुक्यातील गावागावात जाऊन उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करत. प्रत्येकी १२०० रुपये दंड आकारला जात होता. या पथकाचा धसका घेतल्याने अनेकांनी स्वत:ची शौचालये बांधली. शासनाच्या अनुदानामुळेही यामध्ये भर पडली. सध्या तालुक्यातील ९० टक्के गावांमध्ये प्रत्येकाची शौचालये आहेत. परंतु इस्लामपूरसारख्या शहरातील नागरिक अजूनही उघड्यावर शौचास बसतात, ही बाब खेदाचीच म्हणावी लागेल.इस्लामपूर पालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरातील विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालये उभी केली आहेत. सद्गुरू आश्रमशाळेसमोरही सार्वजनिक शौचालय उभे केले आहे. परंतु याचा वापर परिसरातील नागरिक करत नाहीत. या परिसरातील कासेगाव शिक्षण संस्थेसाठी आरक्षित केलेल्या खुल्या भूखंडावरच अनेकजण उघड्यावर शौचास बसत असल्याचे चित्र आहे.अशीच परिस्थिती शहरातील विविध खुल्या भूखंडांची झाली आहे. जिल्हा परिषद शाळा क्र. १ समोरील शासकीय क्रीडांगण, उरुण परिसरातील स्मशानभूमीनजीक असलेला खुला परिसर, महादेवनगरातील मोकळे भूखंड, सांगली रस्त्यावर शेतकऱ्यांच्या उभारलेल्या प्रतिकृतीच्या परिसरातही अनेक नागरिक उघड्यावर शौचास बसत आहेत. दुर्गंधी, तसेच मोकाट जनावरांचा वावर यामुळे शहरातील सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. याविरोधात नगरपालिकेत तक्रारी करूनही याची दखल आरोग्य विभागाने घेतलेली नाही. यामुळे सर्व स्तरातून नाराजीचा सूर उमटत आहे. आता शहरातही नव्याने ‘गुडमॉर्निंग’ पथके नेमून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.घरी वातानुकूलित शौचालय, तरीही... यापूर्वी पालिकेच्या आरोग्य विभागाने अनेकदा गुडमॉर्निंग पथकाच्या माध्यमातून उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली होती. सार्वजनिक शौचालयाचा वापर परिसरातील नागरिक करत नाहीत. शहरातील काही नामवंत पदाधिकारी अजूनही मोकळ्या वातावरणात शौचास जातात. स्वत:च्या घरात वातानुुकूलित शौचालये असूनही ते त्याचा वापर करत नाहीत, याचीही चर्चा शहरातून नेहमीच रंगताना दिसते. त्यांच्यावर कोणते गुडमॉर्निंग पथक कारवाई करणार, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.दंडात्मक कारवाईही केली जात होती. मात्र राजकीय वरदहस्ताने या पथकांचीही नंतर कुचंबणा होऊ लागली. पालिकेने लाखो रुपये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालये उभी केली आहेत. सद्गुरू आश्रमशाळेसमोर सार्वजनिक शौचालय उभे केले आहे.