शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

विषारी पावडर टाकून कृष्णा नदीत मासेमारी- : भिलवडी परिसरातील प्रकाराने चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 11:26 PM

कृष्णाकाठच्या पलूस तालुक्यातील भिलवडी व परिसरात कृष्णा नदीमध्ये अज्ञात तस्करांच्या टोळीकडून विषारी पावडर टाकून मासेमारी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्दे अज्ञातांचे कृत्य

शरद जाधव ।भिलवडी : कृष्णाकाठच्या पलूस तालुक्यातील भिलवडी व परिसरात कृष्णा नदीमध्ये अज्ञात तस्करांच्या टोळीकडून विषारी पावडर टाकून मासेमारी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्याविरोधात वन विभाग व पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी भिलवडी व परिसरातील भोई समाजाकडून करण्यात येत आहे.

भिलवडी, महावीरनगर, धनगाव, औदुंबर, आमणापूर, नागठाणे, चोपडेवाडी आदी गावालगत असणाऱ्या कृष्णा नदीपात्रात या उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात अशापद्धतीने मासेमारी केली जाते. ही सर्व मंडळी परगावहून येऊन हे कृत्य करून पसार होत आहेत. ज्या ठिकाणी पाण्याचा मोठा डोह आहे, नदीकाठी गवत किंवा झाडे आहेत, अशा ठिकाणी माशांचा मोठा वावर असतो. अज्ञात मच्छिमार सायंकाळच्या वेळेस पाण्यामध्ये विषारी पावडर टाकतात.

यानंतर तासाभराच्या कालावधीनंतर त्या परिसरातील मासे मृत होऊन पाण्यावर येऊन तरंगतात. संबंधित मच्छिमार पाण्यावर तरंगणारे मोठाले मासे गोळा करून घेऊन गायब होतात. हे मासे घरी खाण्यासाठी किंवा थेट व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी पाठविले जातात. छडीने, फेक जाळीने किंवा काहिलीने जाळी सोडून पारंपरिक पद्धतीने मासे पकडले जातात. मात्र आता अनैसर्गिक पद्धतीने मासेमारी होते. यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.

पाण्यातील मासे मरत असल्याने ते पाणी पिण्यासाठीही धोकादायक बनत आहे. मे व जून महिन्यात माशांचा प्रजननकाळ असतो. या औषधांमुळे मोठ्या माशांसोबत लहान मासेही मृत होतात. अशाप्रकारे माशांची मोठी तस्करी करणारी टोळी छुप्या पध्दतीने कामकाज चालविते. याचा फटका कृष्णा नदीकाठच्या मच्छिमारांना बसत आहे.भिलवडी, माळवाडी, आमणापूर, वाळवा आदी परिसरातील साडेपाचशेवर भोई समाजातील कुटुंबांचा उदरनिर्वाह पारंपरिक पद्धतीने होणाºया मासेमारीवरच चालतो. विषारी औषधे वापरून होणाºया मासेमारीमुळे नदीपात्रातील माशांची संख्या अचानक कमी होत आहे. मच्छिमारांच्या व्यवसायावर संक्रांत येत आहे.मासे तस्करांवर : कारवाई करावीपारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाºया भोई समाजाचा रोजगार हिरावून घेणाºया अज्ञात टोळीचा शोध घेऊन वन विभाग व पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा भिलवडी गावचे माजी उपसरपंच व सांगली जिल्हा भोई समाजाचे अध्यक्ष तानाजी भोई यांनी दिला आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारSangliसांगलीriverनदी