शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

घानवडमध्ये टेक्स्टाईल कारखान्याला आग

By admin | Updated: June 4, 2015 00:01 IST

शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना : यंत्रसामग्रीसह ६० लाखांचे नुकसान

विटा : विट्याजवळच्या घानवड (ता. खानापूर) येथील लकी लार्क टेक्स्टाईल पार्कमधील रामकुमार धोंडिराम जाधव यांच्या मालकीच्या भैरवनाथ टेक्स्टाईल कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याने सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. कापड तयार करण्याची अद्ययावत किमती यंत्रसामग्री, सूत, इलेक्ट्रॉनिक्स ड्रॉगीस यासह सूत व भरलेले बीम आणि तयार तागे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.घानवड येथील रामकुमार जाधव यांचा लकी लार्क टेक्स्टाईल पार्कमध्ये भैरवनाथ टेक्स्टाईल कारखाना आहे. बुधवारी सकाळी कारखाना सुरू असताना अचानक शॉर्टसर्किट झाल्याने सुताच्या बाचक्याने पेट घेतला. यावेळी कारखान्यात सात कामगार काम करीत होते. आग लागल्याचे समजताच कामगार कारखान्यातून बाहेर पडले. आगीने क्षणातच उग्र रूप धारण केले. काही कळायच्या आतच कारखान्यातील कापड तयार करण्याच्या किमती यंत्रसामग्रीने पेट घेतला.दहा पिकानॉल एअरसेट यंत्रे, दहा इलेक्ट्रॉनिक्स ड्रागीस, सुताची दहा बाचकी, सूत भरलेले १४ बीम व तयार तागे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग लागताच कामगार व तेथील कारखानदारांनी शेजारच्या शिवाजी कलढोणे यांच्या कारखान्यातील कूपनलिकेमधून पाईपद्वारे पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत विटा नगरपरिषदेचे अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले. अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत जाधव यांचे सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. या घटनेची नोंद विटा पोलिसांत झाली असून, हवालदार टी. बी. माळी पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)