शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीमुळे बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

By admin | Updated: October 14, 2014 23:26 IST

२१ पर्यंत मुदतवाढ : शिक्षण मंडळाचा निर्णय

चिपळूण : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. ही निवडणूक संपूर्ण राज्यात उद्या (दि. १५) एकाच वेळी होत आहे. निवडणूक कामासाठी शिक्षकांनाही नेमण्यात आले असल्याने पुढील वर्षी फेब्रुवारी - मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला २१ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. ज्युनिअर कॉलेजमधील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक काम देण्यात आले आहे. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत ८ दिवसांनी वाढविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटनेचे अनिल देशमुख आदींसह विविध मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी संघटनांनी केली होती.  निवडणूक काळात शिक्षक कामकाजात सहभागी असल्याने याबाबतची मागणी लक्षात घेऊन माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सचिव कृष्णकांत पाटील यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या निर्णयामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे विलंब शुल्क वाचणार आहे. शिक्षण मंडळाने मागणीची दखल घेत बारावी परीक्षेसाठीचे अर्ज दाखल करण्याची मुदत तत्काळ वाढवल्याने विद्यार्थ्यांसह पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)