शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहाची अदलाबदल, दोषींवर कारवाई होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST

सांगली : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत झालेल्या महिलेऐवजी पुरुषाचा मृतदेह देण्याचा प्रकार समोर आल्याने रुग्णालयातील सावळा ...

सांगली : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत झालेल्या महिलेऐवजी पुरुषाचा मृतदेह देण्याचा प्रकार समोर आल्याने रुग्णालयातील सावळा गोंधळ समोर आला आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत तातडीने चौकशी पूर्ण करून रविवारी अधिष्ठातांना अहवालही सादर केला असला तरी या प्रकरणातील दोषींवर कारवाई होणार का? हा सवाल कायमच आहे.

शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या कर्नाटकातील महिला रुग्णाचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. याबाबतची माहिती कर्मचाऱ्यांनी नातेवाइकांना दिल्यानंतर काहीवेळाने मृतदेहही ताब्यात देण्यात आला. नातेवाईक मृतदेह घेऊन गावाकडे गेलेही. याचदरम्यान, एका पुरुष रुग्णाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. थोड्यावेळानंतर महिलेऐवजी पुरुषाचा मृतदेह देण्यात आल्याचे समजल्यानंतर धावपळ उडाली. अखेर त्या नातेवाइकांना वाटेतून परत येत मृतदेह बदलून घेऊन जावा लागला होता.

या गंभीर प्रकारानंतर रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. वरिष्ठ पातळीवरून याची गंभीर दखल घेत चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने रविवारी आपला अहवाल सादर केला आहे. त्यात प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचा अहवाल रविवारीच अधिष्ठातांना सादर करण्यात आला आहे. या अहवालात नातेवाइकांनीही मृतदेह ताब्यात घेताना तो व्यवस्थित पाहून घेणे अपेक्षित होते, असेही नमूद करण्यात आल्याचे समजते.

प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, मृतदेह ताब्यात देताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत कोणतीही गांभीर्य दिसून आले नाही. त्यामुळे नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागला. शनिवारी दिवसभर या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर दोषींवर कारवाईचा निर्णय घेण्यात आला असला तरी, याबाबत सारवासारव होण्याचीच शक्यता अधिक व्यक्त होत आहे.

चौकट

अधिष्ठाता काय निर्णय घेणार

झालेल्या प्रकाराबाबत प्रशासन गंभीर असून, दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदकुमार गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे तातडीने समिती गठीत करून अहवालही सादर करण्यत आला आहे. त्यामुळे आता अहवालानंतर अधिष्ठाता काय निर्णय घेणार याकडे लक्ष असणार आहे.