शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
3
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
4
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
5
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
6
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
7
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
8
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
9
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
10
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
11
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
12
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
13
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
14
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
15
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
16
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
17
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
18
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
19
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
Daily Top 2Weekly Top 5

सगळे संपावेत, हीच जयंतरावांची भावना

By admin | Updated: May 3, 2015 00:57 IST

पतंगराव कदम : महत्त्वाकांक्षेपोटी राजकारण

सांगली : जयंतराव जबरदस्त महत्त्वाकांक्षी माणूस आहे. जिल्ह्यातले सगळे मेले पाहिजेत, आपण तेवढे राहिले पाहिजे, अशी भावना ठेवून सर्वांना खेळवत ठेवायचा प्रकार ते करतात, अशी टीका काँग्रेसचे नेते आ. पतंगराव कदम यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली. जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचारात दोन दिवसांपूर्वी डॉ. कदम यांच्यावर माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी टीका केली होती. त्याबाबत पतंगराव म्हणाले की, मला कुणी ‘टार्गेट’ केले तरी मी अशा गोष्टींना जुमानत नाही. वादळे अनेक झेलली आहेत. पचवलीसुद्धा आहेत. त्यामुळे माझ्याविषयी कोणी काहीही टीका केली तरी त्याला मी कधी उत्तर देत नाही. जयंतराव हे एक जबरदस्त महत्त्वाकांक्षा असणारे नेते आहेत. सर्वांनी आपल्या मर्जीप्रमाणे खेळत रहावे, असे त्यांना वाटत असते. त्यांच्या मर्जीनुसार सर्वकाळ सर्वजण खेळत राहतील, असे होणार नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला मी कधी गेलो नाही, कोणावर टीकाही केली नाही, तरीही कोणी मला टार्गेट करीत असेल, तर मला काही त्याच्याशी देणे-घेणे नाही. जिल्ह्यातील सहकाराच्या अधोगतीस संस्थेमधील कारभारीच कारणीभूत आहेत. रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या आदेशामुळे शासनाला अशा सहकारी संस्थांमध्ये प्रशासक नियुक्त करणे भाग पडले. त्यावेळी मी सहकारमंत्रीही नव्हतो. त्यामुळे माझा त्याच्याशी काही संबंध नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता मतदारच काय करायचे ते ठरवतील. कोणाला निवडून द्यायचे, कोणाच्या हाती कारभार द्यायचा, हे त्यांचे त्यांनी ठरवावे. दुष्काळी प्रश्नावर ते म्हणाले की, लोकांच्या जिवाशी कोणी खेळ करू नये. दुष्काळाच्या विषयात राजकारण करणे चुकीचे आहे. राहुल गांधी यांच्यासारखा देशपातळीवरील नेता दुष्काळी भागात फिरत असताना त्याला स्टंटबाजी म्हटले जात आहे. वास्तविक दुष्काळी भागातील लोकांच्या भावना समजून घेतल्यानंतर त्या संसदेत योग्य पद्धतीने मांडता येतात. त्यामुळे कोणत्याही लोकप्रतिनिधीने असे दौरे केले म्हणजे तो स्टंट नसतो. त्यामुळे दुष्काळाच्या प्रश्नावरील असे राजकारण थांबवावे. आघाडी सरकारने आपत्ती व्यवस्थापनाचे चांगले काम केले होते. साडेबारा हजार कोटी रुपये मदत व पुनर्वसन खात्याने दिले. धडाडीने निर्णय आम्ही घेतले होते. संजय पाटलांच्या मी स्वप्नात आलो का? खासदार संजय पाटील यांच्याबद्दल एक अक्षरही मी बोललो नाही, तरीही मी दमबाजी केल्याचे ते सांगत आहेत. त्यांना मी स्वप्नात दिसलो का? की त्यांना माझा भास होतोय, असा सवाल पतंगरावांनी केला. (प्रतिनिधी)