शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

‘विश्वास’मार्फत इथेनॉल प्रकल्प उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : साखर विक्रीला अनेक अडचणी येतात. त्यामुळे दोन-दोन वर्षांची साखर शिल्लक राहते. पुढीलवर्षी इथेनॉल प्रकल्प ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : साखर विक्रीला अनेक अडचणी येतात. त्यामुळे दोन-दोन वर्षांची साखर शिल्लक राहते. पुढीलवर्षी इथेनॉल प्रकल्प उभारून उत्पादन सुरू करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

चिखली (ता. शिराळा) येथे विश्वास कारखान्याच्या ५१ व्या ऑनलाईन वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील, विश्वास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, सौ. सुनीता नाईक, जिल्हा परिषद सदस्या अश्विनी नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार नाईक म्हणाले की, साखरेची आधारभूत किंमत ३६०० पर्यंत होणे आवश्यक आहे, तरच उसाला चांगला दर देता येईल. साखर विक्रीवरील निर्बंध, दर यामुळे दोन दोन वर्षांची साखर शिल्लक राहते. यामुळे आर्थिक अडचणीस तोंड द्यावे लागते. त्यातूनच इथेनॉल निर्मितीचा निर्णय घेतला आहे. कारखान्याची गाळप क्षमता ६००० टन, डिस्टिलरी प्रकल्पाची एक लाख लिटर, वीज निर्मिती प्रकल्प २१ मेगावॅट करण्यात येणार आहे.

ते म्हणाले की, महापुरामुळे नदीकाठाचे ऊस पाण्याखाली राहिले आहेत. त्यामुळे हा ऊस लवकर कसा तोडता येईल, याचा वेगळा आराखडा तयार करण्यात येईल. महापुरामुळे दरवर्षी नदीकाठावर नुकसान होते, त्यामुळे ११-१२ महिन्यांत ऊस उत्पादन करता येईल, अशा बियाणांचे संशोधन सुरू आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी संपूर्ण तालुक्यास या मार्चअखेर मिळेल.

कार्यकारी संचालक राम पाटील यांनी नोटीस वाचन केले. याप्रसंगी सुरेश चव्हाण, सम्राटसिंह नाईक, दीपाली नाईक, डॉ. शिमोनी नाईक, दत्तात्रय पाटील, दिनकर पाटील, विश्वास कदम, भूषण नाईक, अनिल पाटील, विजयराव नलवडे, युवराज गायकवाड, भानुदास पाटील, राजू पाटील उपस्थित होते. विजय थोरबोले यांनी सूत्रसंचालन केले. हंबीरराव पाटील यांनी आभार मानले.

चौकट

औद्योगिक शिराळ्यासाठी प्रयत्न

आ. नाईक म्हणाले की, औद्योगिक शिराळा म्हणून ओळख व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहे. याचबरोबर पर्यटनस्थळ विकास, राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाची बिळाशी येथे उभारणी, भुईकोट किल्ला विकास यावर लक्ष केंद्रित केले आहे.