शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
3
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
4
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
6
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
7
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
8
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
9
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
10
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
11
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
12
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
13
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
14
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
15
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
16
मुंबईत उत्तराखंडमधून आणलेल्या ६.५ कोटींच्या हेरॉईनसह ३ अटकेत, नेमकी कुठे करण्यात आली कारवाई?
17
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
18
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
19
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
20
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जवान निलेश कदम यांना भावपूर्ण निरोप

By admin | Updated: July 7, 2014 00:34 IST

शेगावमध्ये अंत्यसंस्कार : हजारो नागरिकांची उपस्थिती

शेगाव : अमर रहे, अमर रहे, शहीद जवान निलेश निकम अमर रहे! या घोषणांनी शेगाव (ता. जत) येथे निलेश काकासाहेब निकम यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. जवान निलेश निकम यांना सीमेवर गस्त घालताना श्वसनाचा त्रास झाला होता. समुद्रसपाटीपासून सुमारे १८००० फूट उंचीवर लडाख येथे निकम कर्तव्य बजावत होते. श्वसनाच्या त्रासामुळे त्यांचे निधन झाले, हे समजताच गावावर शोककळा पसरली. ही गावातील पहिलीच घटना होती. निकम यांचे पार्थिव काल सकाळी ७ वाजता त्यांच्या राहत्या घरी आणल्यानंतर निलेशचे आई, वडील व बहिणीने हंबरडा फोडला. एकुलता एक मुलगा शहीद झाल्याने निकम कुटुंबियांना दु:ख अनावर झाले होते.
यावेळी ग्रामस्थांचे डोळे पाण्याने डबडबले होते. ७ वाजून २५ मिनिटांनी पोलिसांच्यावतीने, ७ वाजून ३० मिनिटांनी कोल्हापूर येथील टी. ए. बटालियनच्या जवानांनी मानवंदना दिली. यावेळी अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. आठ वाजता निकम यांचे पार्थिव डिजिटल फलक व फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये ठेवून गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी घोषणांनी पसिरातील वातावरण भावूक झाले होते. अकरा वाजता अंतराळ रोडजवळील शेगाव येथील स्मशानभूमीत पार्थिव ठेवण्यात आले.
स्मशानभूमीत पुन्हा कोल्हापूर येथील टी. ए. बटालियनचे सुभेदार पंडित पाटील व त्यांच्या जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून, तर पोलीस दलातील लक्ष्मण चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन फै री झाडून मानवंदना दिली. यावेळी तहसीलदार दीपक वजाळे, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कृष्णाकांत उपाध्याय यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तालुक्याचे नेते विलासराव जगताप, आमदार प्रकाश शेंडगे, भारती बँकेचे संचालक विक्रम सावंत, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे, जि. प. सदस्य सुरेश मुटेकर, संजय सावंत, नगरसेवक उमेश सावंत, रवी सावंत, अ‍ॅड. प्रभाकर जाधव, बाबूराव दुधाळ, डी. एस. पतंगे, सरपंच सौ. रंजना तानाजी हिरवे, माजी आमदार मधुकर कांबळे यांनीही श्रद्धांजली वाहिली. यावेळी कोसारी, काशिलिंगवाडी, सिंगन्नहळ्ळी, बागलवाडी, कुंभारी, बनाळी, वाळेखिंडी या भागातील नागरिकही उपस्थित होते. रविवारी गावातील सर्व व्यवहार दिवसभर बंद ठेवण्यात आले होते. (वार्ताहर)