शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळाच्या गळक्या इमारतीत सर्वत्र पाणीच पाणी!

By admin | Updated: June 2, 2015 00:34 IST

कर्मचाऱ्यांची कसरत : पाठपुरावा करूनही दुर्लक्ष

सांगली : शहरातील शाळा क्र. ६ मध्ये असलेल्या महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात सर्वत्र पाण्याचेच साम्राज्य पसरले आहे. ऐन शाळा प्रवेशाच्या काळातच प्रवेशद्वारापासून चिखल तुडवितच पालकांना कार्यालयाची पायरी चढावी लागत आहे. कार्यालयातील आतील सर्व भिंती पाण्याने चिंब भिजल्या असून सर्वत्र कुबट वास येत आहे. तेथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या तसेच कागदपत्रेही पाण्याने भिजली आहेत. शैक्षणिक वर्ष सुरु झाले असले तरी, शाळा क्र. ६ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत दफ्तर सांभाळत पाण्यातून वाट काढतच जावे लागणार आहे. कारण शाळेच्या क्रीडांगणावर सर्वत्र पावसाचे पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रशासनाने कोणतीच व्यवस्था केली नसल्याने विद्यार्थ्यांना खेळण्यासही क्रीडांगण उपलब्ध होणे अवघड झाले आहे. शाळेच्या वरील बाजूस दुसऱ्या मजल्यावर प्राथमिक शिक्षण मंडळाचे कार्यालय आहे. तेथील कर्मचाऱ्यांनाही प्रवेशद्वारापासून कार्यालयात प्रवेश करण्यासाठी तारेवरची कसरत दररोज विनातक्रार करावी लागत आहे. जिन्यावर अस्वच्छता आहे. कार्यालयाच्या बहुतांश भिंती तसेच छत पावसाच्या पाण्याने भिजले आहे. छतावरुन तर पाणी सतत गळत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांच्या खुर्च्याही भिजल्या आहेत. त्यामुळे तेथे बसून दैनंदिन कामकाज करणे म्हणजे कर्मचाऱ्यांना शिक्षाच आहे. कार्यालयातील जमिनीवर पाणी साचले आहे. तसेच टेबलांवर ठेवलेल्या फायली भिजल्या आहेत. प्रारंभी मंडळाचे कार्यालय खालच्या मजल्यावर होते. तेथील जमीन खचल्याने पाच वर्षापूर्वी त्याचे स्थलांतर वरील मजल्यावर करण्यात आले. प्रत्येक पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना पावसाच्या पाण्याचा त्रास होत आहे. विजेच्या वायरी देखील पाण्याने भिजल्या आहेत. त्यामुळे तेथे शॉर्टसर्किट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)