'आगीशी खेळू नका, अन्यथा काळा इतिहास बाहेर काढेन'; संजयकाका पाटलांचा जयंत पाटलांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 18:11 IST2026-03-20T18:09:19+5:302026-03-20T18:11:05+5:30

संजयकाका पाटील यांनी जयंत पाटलांना थेट जाहीर आव्हान दिले आहे. "जर जयंत पाटील म्हणत असतील की त्यांनी मला भाजपमध्ये पाठवले, तर त्यांनी आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून ही शपथ घेऊन सांगावी," अशा शब्दांत त्यांनी जयंत पाटलांची कोंडी केली आहे.

'Don't play with fire, otherwise I will bring out the black history'; Sanjay Kaka Patil's warning to Jayant Patil | 'आगीशी खेळू नका, अन्यथा काळा इतिहास बाहेर काढेन'; संजयकाका पाटलांचा जयंत पाटलांना इशारा

'आगीशी खेळू नका, अन्यथा काळा इतिहास बाहेर काढेन'; संजयकाका पाटलांचा जयंत पाटलांना इशारा

सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली. जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने भाजपचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील यांची जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी निवड झाली. दरम्यान, यावेळी आमदार जयंत पाटील यांनी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर खोचक टोला लगावला होता. या टीकेला आज पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. माजी खासदार संजयकाका पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. "जयंत पाटील स्वतः भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रही होते आणि त्यासाठी त्यांनी किती वेळा उंबरे झिजवले, याचा साक्षीदार मी स्वतः आहे," असा खळबळजनक दावा संजयकाका यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी संजयकाका पाटील यांच्यावर टीका करताना, "संजयकाका पाटील यांना आपणच भाजपमध्ये पाठवले होते," असे विधान केले होते. जयंत पाटलांच्या याच विधानाचा समाचार घेताना संजयकाकांनी आज जोरदार पलटवार केला.

संजयकाका पाटील यांनी जयंत पाटलांना थेट जाहीर आव्हान दिले आहे. "जर जयंत पाटील म्हणत असतील की त्यांनी मला भाजपमध्ये पाठवले, तर त्यांनी आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून ही शपथ घेऊन सांगावी," अशा शब्दांत त्यांनी जयंत पाटलांची कोंडी केली आहे.

'काळा इतिहास' बाहेर काढण्याचा इशारा

जयंत पाटील यांचे राजकारण इतरांना अडचणीत आणणारे असल्याचा आरोप करत संजयकाकांनी त्यांना गंभीर इशारा दिला. "जयंत पाटलांनी आगीशी खेळू नये. त्यांनी जर मर्यादा ओलांडली, तर त्यांचा सर्व 'काळा इतिहास' मला जनतेसमोर बाहेर काढावा लागेल," असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.

Web Title : आग से मत खेलो, इतिहास खोल दूंगा: पाटिल की चेतावनी

Web Summary : संजयकाका पाटिल ने जयंत पाटिल पर भाजपा में शामिल होने की कोशिश करने का आरोप लगाया और उन्हें अपने बेटे की कसम खाने की चुनौती दी। स्थानीय चुनाव हारने के बाद संजयकाका के भाजपा से संबंध पर आलोचना के बाद उन्होंने जयंत पाटिल के अतीत को उजागर करने की चेतावनी दी।

Web Title : Don't play with fire, or I'll expose history: Patil warns

Web Summary : Sanjaykaka Patil accused Jayant Patil of seeking BJP entry and challenged him to swear on his son. He warned of exposing Jayant Patil's past if provoked, following criticisms related to Sanjaykaka's BJP affiliation after local election defeat.