शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
3
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
4
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
5
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
6
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
7
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
8
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
9
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
10
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
11
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
12
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
13
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
14
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
15
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
16
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
17
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
18
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
19
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
20
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल'ला प्रवेशाच्या बहाण्याने डॉक्टरची १५ लाखांची फसवणूक, नवी मुंबईतील एकाविरुद्ध सांगलीत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 17:14 IST

पैसे परत मागितले. मात्र, वेळोवेळी कापरी याने टोलवाटोलवी केली

सांगली : नवी मुंबईतील एम.जी.एम. मेडिकल कॉलेज, कामोठा येथे मुलाला एमडीएस (ओरल सर्जरी) साठी प्रवेश देतो, असे सांगून सांगलीतील डॉक्टरची १५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत डॉ. चंद्रकांत पंडित सगरे (वय ५४, रा. माळी कॉलनी, वारणाली रस्ता, विश्रामबाग) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित राकेशकुमार कापरी (रा. सेक्टर १९ डी, हॉटेल मेगू इनजवळ, मार्केटजवळ, वाशी, नवी मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

संशयित राकेशकुमार कापरी (पूर्ण नाव माहीत नाही.) याची आणि डॉ. सगरे यांची एप्रिल २०२४मध्ये ओळख झाली होती. तेव्हा कापरी याने नवी मुंबई येथील एम.जी.एम. मेडिकल कॉलेजमध्ये डॉ. सगरे यांचा मुलगा निनाद सगरे याला एमडीएस (ओरल सर्जरी)ला १५ लाख रुपये भरून प्रवेश मिळवून देतो, असे सांगितले. 

डॉ. सगरे यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मे २०२४ ते ऑगस्ट २०२४ पर्यंत कापरी याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या खात्यावर रक्कम पाठवली. मात्र, त्यानंतर निनाद याला ‘एमडीएस’साठी प्रवेश मिळवून दिला नाही. त्यामुळे डॉ. सगरे यांनी त्याच्याकडे दिलेले १५ लाख रुपये परत मागितले. मात्र, वेळोवेळी कापरी याने टोलवाटोलवी केली.

डॉ. सगरे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अखेर डॉ. सगरे यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कापरी याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Doctor cheated of ₹15 lakhs on medical admission pretext.

Web Summary : A Navi Mumbai resident allegedly cheated a Sangli doctor of ₹15 lakhs by promising his son an MDS seat at MGM Medical College. Police have registered a case against the accused, Rakesh Kumar Kapri, for fraud after he failed to secure the admission and refused to return the money.