शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

पवारांसमोर जिल्हा बँकेची नकारघंटा

By admin | Updated: July 16, 2015 00:14 IST

‘सर्वोदय’चे कर्ज प्रकरण : कागदपत्रे दाखविण्यास इन्कार

सांगली : कारंदवाडी येथील सर्वोदय शेतकरी सहकारी साखर कारखान्यास राजारामबापू कारखान्याचे युनिट म्हणून केलेला कर्जपुरवठा आता वादात सापडला आहे. यासंदर्भात सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी जिल्हा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे कर्ज प्र्रकरणाच्या कागदपत्रांची मागणी केली, मात्र अधिकाऱ्यांनी, पवारांचा या कारखान्याशी काही संबंध नसल्याचे सांगून कागदपत्रे व कर्ज प्रकरणाविषयीची कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. यासंदर्भात पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सर्वोदय साखर कारखान्याच्या नावे राजारामबापू कारखान्यास कर्ज दिले आहे. याची माहिती घेण्यासाठी जिल्हा बँकेतील अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो. त्यावेळी त्यांनी ‘सर्वोदय’ला मालतारण दिले आहे, मात्र मालतारण दिलेली साखरपोती ही कारंदवाडी येथे नसून साखराळेच्या गोदामात आहेत, असे सांगितले. कर्ज मागणीची प्रत मागितल्यानंतर त्यांनी आपणास त्रयस्थ व्यक्ती ठरवून माहिती देण्यास नकार दिला. सर्वोदय सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकेचा सभासद आहे. तसेच कर्ज प्रस्ताव व कर्ज मंजुरी ‘सर्वोदय’च्या नावाने आहे. तरीही अधिकाऱ्यांनी आम्हाला अध्यक्ष असूनही त्रयस्थ व्यक्ती ठरविले आहे. राजारामबापूंनंतर एकेकाळी १ जीप मिळण्यासाठी राजारामबापू कारखान्यात कोणी बंड केले होते, याचे अजूनही बरेच साक्षीदार आहेत, असा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी) जयंतराव कसे चालतात?बँकेकडे माहिती मागितली म्हणून आम्हाला त्रयस्थ व्यक्ती ठरविणाऱ्या व्यवस्थापकीय संचालकांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा बँकेच्या बैठकीत कोणत्या कायद्यान्वये बँकेची माहिती दिली? जयंत पाटील हे त्रयस्थ नव्हते का? , असे सवाल पवार यांनी उपस्थित केले आहेत.