नागज फाट्यावर ढालगावचा शेळी-मेंढी व्यापारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:23 IST2021-03-07T04:23:50+5:302021-03-07T04:23:50+5:30

ढालगाव : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नागजफाटा (ता. कवठेमहांकाळ) येथील शिवकृपा पेट्रोलपंपाजवळ टेम्पो व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन ढालगाव ...

Dhalgaon goat-sheep trader killed on Nagaj fork | नागज फाट्यावर ढालगावचा शेळी-मेंढी व्यापारी ठार

नागज फाट्यावर ढालगावचा शेळी-मेंढी व्यापारी ठार

ढालगाव : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नागजफाटा (ता. कवठेमहांकाळ) येथील शिवकृपा पेट्रोलपंपाजवळ टेम्पो व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील शेळी-मेंढी व्यापारी महादेव अर्जुन साबळे (वय ४८) ठार झाले. या अपघातात सौरभ सदाशिव साबळे (१५) गंभीर जखमी झाला, तर पुतण्या अथर्व आबा साबळे (७) आश्चर्यकारकरीत्या वाचला आहे. ही घटना शनिवारी सकाळी साडेसहा वाजता घडली.

मृत महादेव साबळे हे सौरभ साबळे व अथर्व साबळे या दोघांना घेऊन मोटारसायकलवरून (एमएच १० बीएफ ८६५) आटपाडीच्या बाजाराला निघाले होते. नागज येथील शिवकृपा पेट्रोलियमजवळ समोरून येणाऱ्या टेम्पोने (एमएच ११ एएल ५२६०) मोटारसायकलला जोरात धडक दिली. यात महादेव साबळे व सौरभ साबळे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी मिरजेच्या वॉन्लेस रुग्णालयात नेत असताना महादेव साबळे यांचा मृत्यू झाला, तर सौरभवर उपचार सुरू आहेत.

चौकट

नेहमी हसतमुख

महादेव साबळे नेहमी हसतमुख असत. एखाद्या व्यावसायिकाकडे पैसे नसतील तर त्याला पैसे देऊन, तुझ्याकडे आल्यावर दे, म्हणून मदत करायचे. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, बहीण असा परिवार आहे.

Web Title: Dhalgaon goat-sheep trader killed on Nagaj fork