शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

दिघंचीजवळ कर्जबाजारी माय-लेकाचे विष प्राशन

By admin | Updated: October 3, 2015 23:50 IST

आईचा मृत्यू : दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर

दिघंची : सततच्या दुष्काळामुळे कर्जबाजारी झाल्याने आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी (दिघंची) येथील शेतकरी माय-लेकाने कीटकनाशक प्राशन केले. यामध्ये कल्पना उत्तम पुजारी (वय ५०) यांना जीव गमवावा लागला, तर त्यांचा मुलगा देवीदास उत्तम पुजारी (२६) याचे प्राण वाचले. ही घटना शनिवारी सकाळी घडली. दिघंचीपासून पाच किलोमीटरवर पुजारवाडी आहे. तेथे पुजारी कुटुंब शेतातील वस्तीवर राहते. उत्तम पुजारी यांची दीड एकर कोरडवाहू जमीन आहे. पत्नी कल्पना, मुलगा देवीदास, सून यांच्यासह ते मजुरी व शेती करतात. मात्र सततच्या दुष्काळामुळे शेतीला पाणी मिळत नाही. त्यातच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. परिणामी पुजारी कुटुंबाची आर्थिक स्थिती ढासळली आहे. यावर्षी तर पावसाने ओढ दिल्याने पेरणी वाया गेली आहे. शेतीमधून काहीच उत्पन्न मिळणार नसल्याचे चित्र आहे. पुजारी कुटुंबाने सोसायटीकडून कर्ज घेतले आहे. शिवाय गावातील काहीजणांकडून हातउसने पैसे घेतले आहेत. मात्र दुष्काळामुळे कर्ज फेडता आलेले नाही. कर्जाचा बोजा वाढत असल्याने वसुलीचा तगादा सुरू होता. त्यामुळे कल्पना व देवीदास हे मायलेक अस्वस्थ होते. शनिवारी सकाळी उत्तम पुजारी रानात गेले होते, तर देवीदासची पत्नी बाहेर गेली होती. त्यावेळी तणावात असलेल्या कल्पना व देवीदास या मायलेकांनी घरात निआॅन हे कीटकनाशक प्राशन केले. ही बातमी समजताच उत्तम पुजारी, सरपंच आबासाहेब पुजारी, माजी सरपंच बाळासाहेब मोरे व ग्रामस्थांनी दोघांना आटपाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच कल्पना पुजारी यांचा मृत्यू झाला. देवीदास याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेने आटपाडी तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद आटपाडी पोलिसांत झाली आहे. (वार्ताहर)