शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणगावच्या जवानाचा मृत्यू

By admin | Updated: November 26, 2015 00:27 IST

पश्चिम बंगालमधील घटना : गोळ्या लागून मृत्यू झाल्याची माहिती

कडेगाव : भारतीय सीमा सुरक्षा दलात पश्चिम बंगाल येथे कार्यरत असलेले आदित्य चंद्रकांत कदम (वय २४, रा. हिंगणगाव बु., ता. कडेगाव) यांचा पश्चिम बंगाल येथे बंदुकीच्या गोळ्या लागून मृत्यू झाला. याबाबत घटनास्थळावरून सविस्तर माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यामुळे मृत्यूचे निश्चित कारण समजू शकले नाही. दरम्यान, मंगळवारी रात्री ११ वाजता आदित्य यांचा बंदुकीच्या गोळ्या लागून मृत्यू झाला, असे सीमा सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी आदित्य यांचे भाऊ अमोल यांना कळविले. परंतु घटनास्थळावरील सविस्तर माहिती समजली नाही. आदित्य यांचा पश्चिम बंगालमध्ये मृत्यू झाल्याची माहिती हिंगणगाव बुद्रुक या त्यांच्या मूळ गावातील ग्रामस्थांना बुधवारी सकाळी समजली आणि हिंगणगाव व परिसरातील गावांमध्ये शोककळा पसरली.आई, वडील, भाऊ, बहीण, वहिनी अशा कुटुंबासह आदित्य हे बालपणापासून घाटकोपर (मुंबई) येथे राहत होते. आदित्य यांच्या वडिलांचे घाटकोपरमध्ये किराणा मालाचे दुकान आहे. वडील गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. भाऊ अमोल हे खासगी कंपनीत नोकरी करतात. आदित्य हे गेल्या चार वर्षांपासून सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. दरम्यान, आदित्य यांचे पार्थिव शुक्रवार, दि. २७ रोजी हिंगणगाव बुद्रुक येथे त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे. हिंगणगाव येथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती हिंगणगाव येथील त्यांच्या नातेवाईकांनी दिली. (वार्ताहर)