शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

बोरगावातील नदीपात्रात मृत माशांचा खच

By admin | Updated: May 18, 2015 01:02 IST

कृष्णा दूषित : बोरगावसह बहे, फार्णेवाडी, ताकारी गावांमधील नागरी आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष

बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील कृष्णा नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी, मळी मिसळल्याने पाणी दूषित होऊन रविवारी हजारो मासे मृत झाले. बोरगावसह बहे, फार्णेवाडी, ताकारी गावांच्या नदीकाठावर मृत माशांचा खच पडला आहे. यामुळे नदीकाठावरील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एवढे होऊनही संबंधितांवर कारवाई का होत नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. साथीचे रोग पसरू नयेत यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने ग्रामस्थांना पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन केले आहे. मासे मृत होण्याची दहा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कृष्णा नदीपात्रात कारखान्यांनी रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे नदीपात्रातील मासे मृत झाले आहेत. तसेच अनेक माशांच्या जाती संपुष्टात येण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना प्रशासन मात्र गांधारीची भूमिका घेत आहे. नागरिकांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग यांच्याकडे लेखी, तोंडी तक्रार देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आवाज उठवणाऱ्यांवरच कायद्याचा धाक दाखविला जात असल्याने सामान्य नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. प्रदूषण न थांबल्यास नदीकाठचे नागरिक तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. उन्हाळ््यात पाणी कमी होत असताना कृष्णेतील प्रदूषण वाढत आहे. (वार्ताहर)