वसगडेत गव्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST2021-03-07T04:24:14+5:302021-03-07T04:24:14+5:30

ओळ : वसगडे (ता. पलूस) येथील शिवारात शनिवारी गवा आढळून आला. लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : पलूस तालुक्यातील वसगडे-खटाव ...

Darshan of Gavya in Vasgad | वसगडेत गव्याचे दर्शन

वसगडेत गव्याचे दर्शन

ओळ : वसगडे (ता. पलूस) येथील शिवारात शनिवारी गवा आढळून आला.

लोकमत न्यूज नेटवर्क

भिलवडी

: पलूस तालुक्यातील वसगडे-खटाव सीमेवर महावीर पाटील यांच्या उसाच्या शेतात शनिवारी गवा आढळून आला. यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले.

सध्या ऊसताेडीचा हंगाम जाेमात सुरू आहे. ऊसताेड कामगारांबराेबर शेतकऱ्यांची धांदल सुरू असताना गव्याचे दर्शन झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. या परिसरात दाेन वर्षांपूर्वी सुखवाडी येथे गवा रेडा दिसून आला हाेता. गेल्या महिन्यात अंकलखोप गावातून गव्यांचा कळप भिलवडी गावाच्या दिशेने गेला असल्याचे नागरिकांनी पाहिले होते. त्यानंतर हे गवे गायब झाले होते.

याबाबत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने वनखात्याला माहिती दिली आहे. सायंकाळपर्यंत वनखात्याचे अधिकारी वसगडेत दाखल झाले नव्हते. गवा माणसांना हानी पाेहोचवत नाही, तरीही काळजी घेण्याचे आवाहन वसगडेच्या निसर्ग फाैंडेशनचे दीपक परीट यांनी केले.

Web Title: Darshan of Gavya in Vasgad