शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक म्हणतात... ही कसली स्मार्ट सिटी!

By admin | Updated: July 21, 2015 00:49 IST

महापालिका सभा : महापौर-केळकर यांच्यात वादावादी

सांगली : महापालिका क्षेत्राचा समावेश स्मार्ट सिटी प्रकल्पात व्हावा, यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याच्या विषयावरून महापालिकेच्या रविवारी झालेल्या सभेत जोरदार चर्चा झाली. अनेक सदस्यांनी, ही कसली स्मार्ट सिटी?, असा सवाल उपस्थित करून, महापालिका क्षेत्राला रिटायर्ड सिटी, डर्टी सिटीची उपमा दिली. याच मुद्द्यावरून महापौर विवेक कांबळे व भाजपच्या नगरसेविका स्वरदा केळकर यांच्यात वादावादी झाली. केंद्र शासन पुरस्कृत स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्पर्धेत भाग घेण्याचा विषय सभेच्या विषयपत्रिकेवर होता. यावर स्वरदा केळकर यांनी आक्षेप घेतला. शहर सुधारणेच्या बाबतीत कोणत्याही सुधारणा न करता कोणत्या आधारावर आपली महापालिका या स्पर्धेत भाग घेत आहे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, स्वयंमूल्यांकन करून महापालिकेने ५७ गुण मिळविले असले तरी, ही महापालिका शून्य गुणांच्याही पात्रतेची नाही. महापालिकेची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू नसून रिटायर्ड सिटीकडे सुरू आहे. महिलांसाठी पुरेशी शौचालये, शुद्ध पाणी, चांगले रस्ते, सांडपाणी निचरा, वाचनालये, क्रीडांगणे, गटारी, स्वच्छता, पर्यटन विकास अशा सर्वच गोष्टीत सांगली पिछाडीवर आहे, अशी टीका त्यांनी केली. यावर महापौरांनी त्यांना जबाबदारीने मत व्यक्त करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या एकूणच मतावर महापौरांनी आक्षेप घेतल्यामुळे केळकर व त्यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. गौतम पवार म्हणाले की, महापालिकेने स्पर्धेत उतरण्याच्यादृष्टीने कोणतीही तयारी केलेली नाही. शेजारीच असलेल्या कवठेपिरान, हातनूर या गावांचा आदर्श महापालिकेने घेतला पाहिजे. जगन्नाथ ठोकळे म्हणाले की, सांगली शहरातील सांडपाणी अजूनही नदीत मिसळत आहे. सुविधा, स्वच्छता आणि प्रशासकीय शिस्त, योजना याबाबतीत महापालिका अजून खूप पिछाडीवर आहे. शेखर माने म्हणाले की, ई-गव्हर्नन्स योजना बंद करून महापालिकेने चूक केली आहे. तरीही महासभेत हा ठराव मंजूर करण्यात आला. (प्रतिनिधी)