शिराळा तालुक्यात ४८ तासांनंतर कोरोनाचे लसीकरण पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:25 IST2021-04-11T04:25:11+5:302021-04-11T04:25:11+5:30

शिराळा : शिराळा उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये गुरुवार दि. ८ एप्रिल रोजी दुपारी १ वाजल्यापासून ...

Corona vaccination resumed in Shirala taluka after 48 hours | शिराळा तालुक्यात ४८ तासांनंतर कोरोनाचे लसीकरण पूर्ववत

शिराळा तालुक्यात ४८ तासांनंतर कोरोनाचे लसीकरण पूर्ववत

शिराळा : शिराळा उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये गुरुवार दि. ८ एप्रिल रोजी दुपारी १ वाजल्यापासून लस शिल्लक नसल्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंद होते. शनिवार दि. १० राेजी सकाळी ११ वाजता लस आल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू झाले आहे.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध काकडे म्हणाले, उपजिल्हा रुग्णालयात दररोज सरासरी ९५ ते ११० नागरिक लसीकरण करून घेतात. त्याचबरोबर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये देखील आसपासच्या गावातील नागरिक येऊन लसीकरण करून घेतात. गुरुवारी दुपारी १ वाजल्यापासून लस संपल्यामुळे लसीकरण थांबवण्यात आले होते.

सांगलीच्या शासकीय रुग्णालयातून तालुक्यासाठी शनिवारी सकाळी २ हजार लसी मिळाल्या. यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये लसीकरण सुरू आहे. उपजिल्हा रुग्णालयातही लसीकरण सुरू झाले आहे. दोन दिवस नागरिकांनी सहकार्य केले आहे. कोरोनावरील अँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्याही सुरू आहेत. नागरिकांनी त्रास जाणवू लागल्यास दिरंगाई न करता जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा आणि योग्य ते औषधोपचार करून घ्यावेत.

Web Title: Corona vaccination resumed in Shirala taluka after 48 hours