शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

अनिश्चिततेच्या मैदानाबाहेर जोर-बैठका

By admin | Updated: September 17, 2014 23:05 IST

सांगली मतदारसंघ : भाजप, कॉँग्रेस उमेदवारांची वाट खडतर

अविनाश कोळी - सांगली-- तिकीट कोणाकोणाला मिळणार, बंडखोरी कोण करणार, लढत कोणाकोणाची होणार, आघाडी किंवा महायुती होणार की नाही, जागांची अदलाबदल होणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अजून मिळाली नसली, तरी इच्छुकांनी मैदानाबाहेर जोर-बैठकांवर जोर दिला आहे. बंडखोर व अपक्ष लढू पाहणाऱ्यांनीही गुडघ्याला बाशिंग बांधून वरातीची तयारी केल्याने सांगली विधानसभा मतदारसंघात आता बहुरंगी लढतीची दाट शक्यता दिसत आहे.गतवेळच्या निवडणुकीप्रमाणे यंदाही कॉँग्रेस व भाजप यांच्यातच खरी लढत होईल, असे मानले जात असले, तरी मैदानात कोणकोण उतरणार, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. भाजपकडून संभाजी पवार आणि कॉँग्रेसतर्फे मदन पाटील यांना उमेदवारी मिळेल, अशी खात्री पक्षीय स्तरावरील कार्यकर्ते व्यक्त करीत असले, तरी त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर बंडखोरही मैदानात उतरणार आहेत. यंदाची राजकीय परिस्थिती गतवेळच्या तुलनेत पूर्णपणे बदलली आहे. कॉँग्रेस व भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष व गटबाजी टोकाला गेली आहे. कोणालाही तिकीट मिळाले तरी, पक्षीय नेते, कार्यकर्ते एकसंधपणे अधिकृत उमेदवाराला मदत करतील, याची कोणतीही शक्यता सध्या दिसत नाही. दोन्ही पक्षात एकमेकांचे पाय ओढण्याचे प्रकार होण्याचे संकेत मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपने कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले असले, तरी विधानसभेला भाजपची वाट खडतर असणार आहे. अंतर्गत संघर्ष व बंडखोरांचा त्रास भाजपच्या अधिकृत उमेदवाराला होणार, हे निश्चित. तशीच परिस्थिती कॉँग्रेसची आहे. किंबहुना कॉँग्रेसला याठिकाणी अधिक कष्ट घ्यावे लागतील. गतवेळी या मतदारसंघात कॉँग्रेसचा पराभव झाला होता. गेल्या चोवीस वर्षांत अपवादानेच कॉँग्रेसला याठिकाणी यश मिळाले आहे. त्यामुळे यंदा यशासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. त्यातच पक्षांतर्गत विरोध यावेळी अधिक असण्याची शक्यता आहे. कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचे भवितव्य केवळ मतविभागणीच्या आकड्यांवर अवलंबून आहे. विरोधी उमेदवाराची, त्याच्या पक्षाची मते विभागली गेली, तरच कॉँग्रेसला फायदा होऊ शकतो, मात्र हीच परिस्थिती कॉँग्रेसच्या बाबतीतही होऊ शकते. कॉँग्रेसच्या मतांची विभागणी झाली, तर पुन्हा विरोधी उमेदवाराला संधी मिळू शकते. या दोन्ही पक्षांची वाट बिकट आहे. त्यामुळेच यंदाच्या रिंगणात अपक्ष व बंडखोरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होईल म्हणून अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. यंदा सांगलीच्या मैदानात उमेदवारांची भाऊगर्दी होणार आहे.