शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कासेगावात दूषित पाणी

By admin | Updated: April 20, 2015 00:04 IST

ग्रामस्थ संतप्त : प्रभाग ४ मध्ये पाण्यात पक्ष्यांची पिसे, कचरा

कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील प्रभाग क्र. ४ मध्ये गेल्या चार दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. रविवारी तर अक्षरश: पाण्यातून पक्ष्यांची पिसे, केस, इतर कचरा आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांतून ग्रामपंचायतीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.कासेगाव येथील प्रभाग क्र. ४ हा बाजारपेठेपासून जुना स्टँड रोडवरील पश्चिम भागापर्यंत पसरला आहे. शुक्रवारी दि. १७ रोजी याठिकाणी दूषित पाणी पुरवठा झाला होता. त्यावेळी काही ठिकाणी अत्यंत गढूळ पाणी पुरवठा झाला होता. मात्र टाकी धुतली असावी म्हणून ग्रामस्थांनी याकडे दुर्लक्ष केले. परंतु रविवारी पुन्हा सकाळी पाणी सुटल्यानंतर पुन्हा एकदा दूषित पाणी पुरवठा सुरु झाला.यावेळी चक्क पाण्यातून पक्ष्याची पंखे, कचरा, केस मिळून आले. त्यामुळे लोकांच्यात घबराट निर्माण झाली आहे. यावेळी या प्रभागातील अ‍ॅड. संदीप पाटील, शंकर पाटील, दस्तगीर मुल्ला, श्रीरंग पाटील, अमोल वीर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुपरवायझर ए. पी. जाधव व जलस्वराज्य प्रकल्पाचे पंप आॅपरेटर सुनील माने यांना तातडीने बोलावून घेतले.
यावेळी पंप आॅपरेटर सुनील माने म्हणाले, दूषित पाण्याचा पुरवठा झाला हे खरे आहे. यावेळी ग्रा. पं. सदस्य निवास पाटील हेही उपस्थित होते. रविवारी उपसरपंच शिवाजी पाटील यांना हे दूषित पाणी प्रभागातील ग्रामस्थांनी दाखवले. यावर पाटील यांनी प्रभाग क्र. ४ मधील पाईपलाईनचे वॉशआऊट करुन घेतले जाईल, असे आश्वासन दिले.
वारंवार होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी या प्रभागातील नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. अनेकांनी ग्रामपंचायतीच्या या दुर्लक्षामुळे संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)