शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेची खात्री, पण ‘चमत्कारा’ची भीती

By admin | Updated: August 4, 2015 23:36 IST

जयंत पाटील : सांगली बाजार समितीच्या निवडणुकीबाबत मत

सांगली : सांगलीच्या बाजार समितीमध्ये आमच्याच पॅनेलची सत्ता येणार, याची खात्री असली तरी, त्यांच्या ‘चमत्कारा’ची भीतीही वाटते, असे मत आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील आर्थिक चमत्काराचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला. ते म्हणाले की, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी काही ठिकाणी विशेष चमत्कार घडविले होते. तसे चमत्कार बाजार समितीच्या निवडणुकीत होतील की काय, अशी शंका वाटते. शेवटच्या दोन दिवसातच ते असे चमत्कार करीत असतात. त्यामुळे त्या गोष्टीकडे आमचे लक्ष राहील. सहकारी संस्थांच्या बरखास्तीचा जो निर्णय झाला, तो मंत्रिमंडळाशी संबंधित नाही. संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी तो निर्णय घेतला होता. त्यामुळे जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय मागे घेण्यास ते तयारच नव्हते. यासंदर्भात आर. आर. पाटील व आपण दोघांनी तक्रार केली होती. शेवटी त्यांनी जो निर्णय घेतला होता, तो पुढे रेटला. त्यामुळे संस्था बरखास्तीवेळी आम्ही गप्प बसलो होतो, हे विरोधकांचे विधान चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.कवठेमहांकाळ येथील पदाधिकाऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत विश्वासात घेतले नाही, म्हणून त्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यांच्या या भावनेची आम्ही दखल घेतली आहे. त्यासंदर्भात नाराज कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चासुध्दा केली आहे. त्यांची नाराजी दूर होईल. नाराज लोक कोणत्याही दुसऱ्या पक्षाकडे जाणार नाहीत. तासगाव-कवठेमहांकाळमधील कार्यकर्त्यांच्या भावनांचा योग्य विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पक्षीय बळाचे गणित मांडले जात आहे. वास्तविक ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर कधीच लढविल्या जात नाहीत. त्यामुळे या निकालावरून आमच्या पक्षाची ताकद कमी झाल्याचा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)भावा-भावात भांडणे होतीआर. आर. पाटील यांना छोटा भाऊ मानणाऱ्या पतंगरावांनी छोट्या भावाचे कार्यकर्ते मोठ्या भावाकडेच येणार असल्याचे मत काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. त्यावर जयंतराव म्हणाले की, ते त्यांना भाऊ मानत असले तरी, भावा-भावात भांडणे होती म्हणून तर दोघे वेगवेगळ्या पक्षात राहिले. त्यामुळे या छोट्या भावाचे कार्यकर्ते त्यांच्याकडे जातील, अशी कोणतीही चिन्हे नाहीत. आम्ही इतके दुबळे नाही...जिल्हास्तरीय संस्थांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित यायला हवे, असे मत काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आ. पतंगराव कदम यांनी व्यक्त केले होते. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. त्यामुळे त्यांच्याशी आघाडी करून लढण्याची गरज वाटत नाही. जिल्हास्तरीय निवडणुका त्यांना घेऊन लढविण्याइतपत आम्ही दुबळे नाही.